विधानभवनात बॉम्ब ठेवल्याचा ई मेल आला आणि पोलिसांची धावपळ झाली

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणाऱ्या मुंबईत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू आहे. कामकाज सुरळीत सुरू आहे. अर्थसंकल्पही सादर करून झाला आहे. इतर कामकाज सुरू असताना गुरुवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीने विधानभवनात बॉम्ब ठेवल्याचा ई मेल पाठवला. हा ई मेल मिळताच पोलिसांची धावपळ झाली.


खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी विधानभवनातून अधिकारी आणि कर्मचारी यांना बाहेर काढून तातडीने तपासणी केली. तपासणी दरम्यान निव्वळ दहशत पसरवणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे या हेतूने ई मेल केल्याचे लक्षात आले. यानंतर विधानभवनात कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली. पोलिसांनी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने धमकीचा ई मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू केला आहे. संबंधित व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.


खलिस्तान समर्थक अज्ञाताने दिलेली धमकी


खलिस्तान समर्थक अज्ञाताने मुंबईचे विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई मेल मुंबई पोलीस आयुक्तालयाला पाठवला. यानंतर अधिकारी आणि कर्मचारी यांना मोकळ्या जागेत थांबवून विधानभवनात तपासणी करण्यात आली. इमारतीत बॉम्ब नसल्याची खात्री झाल्यानंतर कामकाज सुरू करण्यात आले. धमकी देणाऱ्याचा शोध घेण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण