Hardik Pandya : हार्दिक पांड्याच्या 'त्या' कृतीवरून वाद; राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याने पुण्यात तक्रार

हार्दिक पांड्या याच्याविरोधात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करत पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या टी २० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. या विजयानंतर मैदानावर खेळाडूंच्या सेलिब्रेशन दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.


या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या आपल्या मैत्रीण महिका सोबत मैदानावर रोमँटिक होताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. त्यावेळी पांड्याने अंगावर भारतीय तिरंगा घेतला होता. या पार्श्वभूमीवर पुण्यातील एका वकिलाने शिवाजीनगर पोलीस स्थानकात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याची तक्रार दाखल केली आहे.


वकिलाने केलेल्या तक्रारीनुसार, राष्ट्रध्वज परिधान करून अशा प्रकारचे वर्तन करणे हे राष्ट्रीय गौरवाचा अवमान ठरू शकते. त्यामुळे संबंधित कायद्यांतर्गत हार्दिक पांड्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



दरम्यान, या प्रकरणावर हार्दिक पांड्या किंवा बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर मात्र या घटनेवरून जोरदार चर्चा सुरू आहे.


Comments
Add Comment

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त