नागपूर नवीन विधानभवनचे काम विहित कालावधीत पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: नागपूर नवीन विधानभवनचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात यावे. विधानसभा आणि विधान परिषदेचे सभागृह, मध्यवर्ती सभागृह असलेले मुख्य संकुल, स्वतंत्र प्रशासकीय इमारतीची कामे विहित कालावधीत होण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


बैठकीत नागपूर येथील नवीन विधानभवन मुख्य संकुल व प्रशासकीय इमारत, नेरळ -शिरूर या पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाला पर्यायी नवीन महामार्गासह, अलिबाग- विरार महामार्गाच्या अटल सेतू , मुंबई गोवा महामार्ग, पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग जोडणारे विविध नोड व पुणे–शिरूर सहा पदरी उन्नत मार्गाच्या प्रकल्पाबाबत भूसंपादन, मंजुरी प्रक्रिया, निधी तरतुदी याबाबत चर्चा झाली.


मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा भार कमी करणाऱ्या नेरळ शिरूर या नवीन महामार्गाबाबात बैठकीत चर्चा झाली. रायगड जिल्ह्यातील कर्जत नेरळ येथून सुरू होणारा हा महामार्ग पुणे -अहिल्यानगर महामार्गावरील शिरूर येथे जोडला जाईल. राज्यातील अनेक भागातून येणाऱ्या वाहनांना सोयीस्कर असा हा महामार्ग असेल. या नियोजित महामार्गासाठी आवश्यक मान्यता व निधी तरतुदी बाबत कार्यवाही केली जावी यादृष्टीने यावेळी सूचना देण्यात आल्या.


यासह वाढणारी वाहतूक आणि भविष्यात वाहनांची संख्या लक्षात घेता, पुणे ते शिरूर या महामार्गावरील सहा पदरी उन्नत मार्ग आणि चार पदरी जमिनीच्या समतल (ॲट ग्रेड) मार्गाचे कामांतील तांत्रिक तपशीलबाबत चर्चा करण्यात आली.
नागपूर येथील नवीन विधानभवन १९२० साली बांधण्यात आलेल्या सध्याच्या विधान भवनाच्या जागी तयार होणाऱ्या नवीन विधानभवन मध्ये विधानसभा आणि विधान परिषदेचे सभागृह, मध्यवर्ती सभागृह यासह समिती कक्ष, पत्रकार कक्ष आदी विधिमंडळ व प्रशासकीय कामकाजासाठी सुविधा असलेले मुख्य संकुल यांचे ए, बी आणि सी ब्लॉकच्या ६२ हजार ९२४ चौरस फूट आराखड्याच्या चार मजली मुख्य संकुलास ६६२ कोटी रुपये व प्रशासकीय इमारतीसाठी ३३९ कोटी रुपये तरतूद करण्यात येत आहे. नवीन विधान भवनातील विधानसभेत एकूण ४०० आसन क्षमता राहणार असून विधान परिषद सभागृहाची क्षमता १२० तर मध्यवर्ती सभागृहाची आसन क्षमता ७०० राहील.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी