Vidhan Bhavan Bomb Threat : विधानभवन उडवण्याची धमकी देणारा ई-मेल ‘फेक’

- अफवांवर विश्वास ठेवू नका; गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि पंकज भोयर यांचे सभागृहातून आवाहन


मुंबई : विधानभवनासह मुंबईतील ४ महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी एका निनावी ई-मेलद्वारे १२ मार्च रोजी दिवशी सकाळी देण्यात आली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण असले, तरी प्राथमिक अन्वेषणात हा ‘हॉक्स’ (खोटी धमकी) ई-मेल असल्याचे समोर आले आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि पंकज भोयर यांनी परिस्थिती स्पष्ट करत जनतेला घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.


सकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी एका मेल द्वारे विधान भवनासह मुंबईतील चार ठिकाणी बॉम्बची धमकी देण्यात आली होती, अशी माहिती विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली. या चार ठिकाणांमध्ये विधान भवन, मुंबई शेअर बाजार, मुंबई मेट्रो, मुंबई उच्च न्यायालय यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मेलमध्ये स्फोट होण्याची वेळ देखील देण्यात आली. त्यामुळे तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असल्याची माहिती राम शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.


नेमकी घटना काय ?


सकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला होता. यामध्ये स्फोट घडवून आणण्याची वेळही देण्यात आली होती. यामध्ये मिसाईल हल्ल्याचाही उल्लेख होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दल आणि ‘बॉम्ब शोधक आणि नाशक पथक’ यांनी तातडीने शोध मोहीम राबवली. धमकी मिळताच मुंबई पोलिसांनी संपूर्ण दक्षिण मुंबईत आणि विशेषतः विधानभवन परिसरात शोध मोहीम (सर्च ऑपरेशन) राबवले. विधानभवनाच्या सर्व प्रवेशद्वारांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रत्येक येणार्‍या-जाणार्‍या व्यक्तीची कसून पडताळणी केली जात आहे.


- या संदर्भात गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, विधिमंडळ उडवून देण्याची धमकी मिळणे ही वस्तुस्थिती आहे; परंतु हा प्रशासनाचे लक्ष विचलित करण्याचा एक खोटा प्रयत्न (हॉक्स) आहे. भारताचे जागतिक स्तरावरील वाढते वलय पहाता मिसाईल आक्रमणाची शक्यता अत्यंत अल्प आहे. कोणत्याही राजकीय घटनेशी किंवा आखाती देशांतील युद्धाशी याचा संबंध जोडणे चुकीचे ठरेल. विधानभवन पूर्णपणे सुरक्षित आहे.


- गृहराज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की, देशात आणि राज्यात शांतता असतांना काही विकृत व्यक्ती वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र गृहविभागाच्या तत्परतेमुळे हे कारस्थान हाणून पाडण्यात आले आहे. विधानभवनाच्या सर्व प्रवेशद्वारांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रत्येक व्यक्तीची कसून पडताळणी केली जात आहे. हा ई-मेल कोठून आला, याचा शोध सायबर सेल आणि पोलीस यंत्रणा घेत आहेत.


Comments
Add Comment

Milind Soman Fitness : वयाच्या 60 व्या वर्षीही फिटनेस जबरदस्त! मिलिंद सोमण यांचा 15 मिनिटांचा वर्कआउट आणि फिटनेस मंत्र

Milind Soman Fitness Routine : वयाच्या ६० व्या वर्षीही उत्तम फिटनेस आणि उत्साह कायम ठेवणारे अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे