डाऊ जोन्सच्या शाश्वतता निर्देशांकात गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडची पहिल्या क्रमांकावर बाजी!

मुंबई : बाजारपेठांमध्ये अग्रगण्य एफएमसीजी कंपनी असलेल्या गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने (जीसीपीएल)डाऊ जोन्स बेस्ट-इन-क्लास सस्टेनेबिलीटी इंडेक्स २०२५ मध्ये जागतिक स्तरावर एफएमसीजी श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. जागतिक स्तरावर अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणा-या या निर्देशकांत कंपनीने पहिल्यांदाच सर्वोच्च स्थान मिळवून एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक व्यवसाय पद्धतींमध्ये जागतिक स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारी कंपनी म्हणून या मानांकनामुळे गोदरेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने एसएण्डपी ग्लॉबलच्या कॉर्पोरेट सस्टेनेबिलीटी असेसमेंट (सीएमए) अंतर्गत पर्सनल प्रॉडक्ट्स श्रेणीत १०० पैकी ८९ गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. जागतिक स्तरावर ३ हजार ५०० हून अधिक कंपन्यांचे मूल्यमापन करण्यात आलेल्या या प्रक्रियेत जीसीपीएलने वेगवेगळ्या निकषांत आपली गुणवत्ता सिद्ध केली. पर्यावरण, सामाजिक जबाबदारी, योग्य प्रशासन या निकषांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या आघाडीच्या ग्राहक वस्तू कंपन्यांमध्ये जीसीपीएलने सर्वोच्च स्थान पटकावले. हा बहुमान कंपनीने शाश्वत विकासाच्या प्राथमिकतांमध्ये केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीचे व विकासाचे प्रतीक आहे. एफएमसीजी क्षेत्रासाठी डाऊ जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्स अंतर्गत उत्सर्जन कमी करणे, कच्च्या मालाचा जबाबदारीने पुरवठा, उत्पादनानंतर कचरा व्यवस्थापन, पॅकेजिंग व्यवस्थापन, जलसंपदा व्यवस्थापन, शाश्वत स्त्रोतांचा वापर, कामगार पद्धती आणि इतर अनेक निकषांचा आढावा घेतला जातो. या सर्व निकषांमध्ये जीसीपीएलने बाजी मारली.


कॉर्पोरेट सस्टेनेबिलीटी असेसमेंटमधील १० वर्षांच्या सक्रिय सहभागाकरिताही एस एण्ड पी ग्लोबलने गोदरेज कन्झुमर प्रॉडक्ट्स लिमिटेडची प्रशंसा केली. यावेळी कंपनीचा खास सत्कारही करण्यात आला. हा सन्मान कंपनीची विविध कार्यपद्धतीतील कटिबद्धता दर्शवतो. कामातील पारदर्शकता, सातत्यपूर्ण सुधारणा आणि शाश्वत विकासाला आपल्या मुख्य व्यवसाय धोरणाचा भाग बनवण्यासाठी कंपनी दशकभराहून अधिक काळ सातत्याने प्रयत्नशील आहे. पर्यावरण, सामाजिक मूल्ये कार्य तसेच योग्य प्रशासन या घटकांना व्यवसायाच्या प्रत्येक स्तरावर समाविष्ट केले जाते. यातूनत कंपनीने जबाबदारपूर्वक दूरदृष्टीपूर्वक विचारांतून नेतृत्वगुणाची भूमिका निभावल्याचे या सन्मातून सिद्ध होते.


गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर सीतापती यांनी या सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले. ‘’डाऊ जोन्स बेस्ट-इन-क्लास इंडेक्समध्ये जागतिक स्तरावर पहिला क्रमांक पटकावणे हा आमच्या कंपनीसाठी एक मैलाचा दगड ठरला आहे. हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. उदयोन्मुख बाजारपेठांमधील ग्राहकांना आरोग्य आणि सौंदर्याचा लाभ मिळवून देण्याच्या आमच्या मूळ उद्देशातच शाश्वत विकासाची संकल्पना रुजली आहे. आम्ही नफा कमावताना पर्यावरण आणि सामाजिक मूल्येही जपतो. याच दृष्टीकोनातून ब्रँण्ड, उत्पादने आणि इतर व्यावसायिक कामकाज चालवले जाते. पर्यावरणपूरक उत्पादने, पाण्याचे आणि निसर्गाचे संवर्धन होण्याकरिता विविध उपक्रम राबवणे, ऊर्जा कार्यक्षमतेत वाढ यांसारख्या क्षेत्रांमद्ये आम्ही विकासाची उंच झेप घेतली. कंपनीने संपादित केलेले हे यश आज सन्मानाच्या रुपाने आम्हांला मिळाले. या सन्मानामुळे आमची जागतिक पातळीवर एफएमसीजी उद्योगांत स्वतःसाठी तसेच संपूर्ण क्षेत्रासाठी उच्च मापदंड निर्माण करण्याची बांधिलकी दृढ झाली आहे’’, असे त्यांनी नमूद केले.


गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपच्या शाश्वत आणि सीएसआर विभागाच्या प्रमुख पाक्झान दस्तूर यांनीही या सन्मानानंतर कंपनीची भूमिका मांडली. त्या म्हणाल्या,’’ आंतरराष्ट्रीय पातळीवरील हा सन्मान आमचे सातत्य, शिस्त आणि ध्येयनिष्ठ कामाची पावती आहे. गेल्या दहा वर्षांपासून आम्ही कॉर्पोरेट सस्टेनेबिलीटी असेसमेंटमध्ये सहभाग घेत आहोत. या सहभागातून आमच्या दिशेने सुरु असलेले कार्यपद्धती, कामाप्रती पारदर्शकता आणि सातत्यपूर्ण सुधारणा या सर्व घटकांप्रती असलेली वचनबद्धता दिसून येते. गोदरेज ग्रुपमध्ये गुड एण्ड ग्रीन या तत्वाचे पालन केले जाते. आम्ही कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर देतो. यांसह शाश्वत खरेदी प्रक्रिया राबवणे, जल आणि कचरा व्यवस्थापन, प्लॅस्टिकच्या कच-याचे योग्य नियोजन करणे आदी पर्यावरण समस्यांवर मात करण्यासाठी आवश्यक कृती राबवल्या जातात. या पर्यावरणीय समस्यांवर मात करणे हे आमच्या मुख्य व्यावसायिक धोरणांचा आणि दैनंदिन कामकाजाचा महत्त्वाचा भाग आहे. डाऊ-जोन्स बेस्ट-इन-क्लास इंडेक्स २०२५ मध्ये आम्हांला जगातील अव्वल कंपनीचा मान मिळाला आहे. या पुरस्कारामुळे कंपनीतीने पुरस्कृत केलेली शाश्वतता आमच्या कार्यपद्धतीचा आणि प्रगतीचा अविभाज्य घटक बनली आहे, हा विश्वास दृढ करते. हा सन्मान आम्हांला समाज आणि पर्यावरणासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देतो. आता यशाचे नवनवीन मापदंड प्रस्थापित करण्याकिरता प्रोत्साहन मिळाले आहे.’’
एस एण्ड पी ग्लोबल सस्टेनेबलचे वरिष्ठ संचालक आणि कॉर्पोरेट सोल्यूशन्स एण्ड एन्गेजमेंट विभागाचे प्रमुख रॉबर्ट डॉर्नो यांनी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीला मिळालेल्या पुरस्काराबद्दल कंपनीच्या कार्यपद्धतीची प्रशंसा केली. ते म्हणाले, “गेल्या दहा वर्षांपासून जीसीपीएलने एस एण्ड पी ग्लोबल सीएसएमध्ये सातत्यपूर्ण सहभाग नोंदवला आहे. हा सहभाग कंपनीचा सातत्यपूर्ण प्रयत्नांचा आणि कटिबद्धतेचा भक्कम पुरावा आहे. या प्रवासात आम्ही तुमच्यासोबत उपस्थित राहिल्याचा आम्हांला सार्थ अभिमान वाटतआहे. आम्ही भविष्यातही तुमच्या निरंतर प्रगतीला पाठिंबा देण्यासाठी उत्सुक आहोत.”


डाऊ जोन्स बेस्ट-इन-क्लास हा निर्देशांक एस एण्ड पी ग्लोबल यांच्या कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंटवर आधारित असून, आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक या तिन्ही महत्त्वाच्या घटकांच्या आधारे कंपन्यांच्या शाश्वत कामगिरीचे मूल्यमापन करणा-या जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह मानांकनांपैकी एक मानला जातो. या निर्देशांकाच्या माध्यमातून कंपन्यांच्या जबाबदार व्यवसाय पद्धती, पर्यावरण संवर्धनासाठीचे प्रयत्न, सामाजिक उत्तरदायित्व तसेच दीर्घकालीन शाश्वत विकासाप्रती बांधिलकी या सर्व घटकांचे परिक्षण केले जाते.

Comments
Add Comment

Dabur India : डाबरच्या पोर्टफोलिओत सेसा केअरचा समावेश; NCLTकडून विलीनीकरणाला मंजुरी

मुंबई : प्रीमियम आयुर्वेदिक हेअर केअर ब्रँड सेसा केअर प्रायव्हेट लिमिटेडच्या डाबर इंडियामधील विलीनीकरणाला

LG Electronics India : 'एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया'ला ₹153.58 कोटींच्या सीमाशुल्क वसुलीची नोटीस; रॉयल्टी पेमेंट न जोडल्याचा आरोप

मुंबई : एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेडला काही आयात केलेल्या वस्तूंच्या करपात्र मूल्यात रॉयल्टी पेमेंटचा

Starbucks : स्टारबक्सचा मोठा निर्णय; उत्तर अमेरिकेतील 250 कॉफी शॉप्स बंद होणार

मुंबई : स्टारबक्स आपल्या स्टोअर नेटवर्कचा आढावा घेत असून, या प्रक्रियेअंतर्गत उत्तर अमेरिकेतील 250 कॉफी शॉप्स

Federal Bank FASTag : जुन्या फास्टॅगला रामराम न करता बँक बदलणे झाले सोपे! फेडरल बँकेकडून क्रांतिकारी 'वनटॅग' सुविधा सुरू

मुंबई : भारतातील डिजिटल वाहतूक व्यवस्थेत एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी पाऊल उचलत Federal Bank ने 'OneTag – FASTag Portability' ही नवीन

Gold Price Today : खरेदीदारांसाठी दिलासा! 24 सप्टेंबरला सोन्या-चांदीचे भाव घसरले, सोनं इतक्या रुपयांची झालं स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. बुधवारी दरात वाढ झाल्यानंतर

IPO Investment : एलिवेट कॅम्पसेसचा २,१०० कोटी रुपयांचा आयपीओ खुला; पैसे गुंतवण्याची शेवटची तारीख कोणती?

नवी दिल्ली: शैक्षणिक संस्थांसाठी इन्फ्रास्ट्रक्चरल मॅनेजमेंट सेवा पुरवणाऱ्या एलिवेट कॅम्पसेस लिमिटेड (Elevate Campuses