Gold Price Today : खरेदीदारांसाठी दिलासा! 24 सप्टेंबरला सोन्या-चांदीचे भाव घसरले, सोनं इतक्या रुपयांची झालं स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. बुधवारी दरात वाढ झाल्यानंतर आज, 24 सप्टेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. भारतीय सराफा बाजारासोबतच मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वरही सोन्याच्या दरात घट नोंदवण्यात आली.



सोन्याचे दर घसरले


MCX वरील सकाळच्या व्यवहारानुसार, ऑक्टोबर एक्सपायरी असलेले सोने 368 रुपयांनी घसरून 1,50,931 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले. तर डिसेंबर एक्सपायरी असलेली चांदी 2,34,750 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार करत होती.



सराफा बाजारातील उपलब्ध आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर आज बहुतांश ठिकाणी सुमारे 15,421 रुपये प्रति ग्रॅमच्या आसपास आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 14,134 ते 14,141 रुपये प्रति ग्रॅमच्या दरम्यान आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 11,566 ते 11,904 रुपये प्रति ग्रॅमच्या आसपास आहे. शहरानुसार आणि सराफांच्या दरानुसार या किमतींमध्ये काही फरक असू शकतो.


दरम्यान, मागील वर्षभरात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल, जागतिक आर्थिक परिस्थिती आणि मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची खरेदी यामुळे सोन्याच्या दराला आधार मिळत आहे.


आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दराबाबत विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. J.P. Morgan च्या अहवालानुसार, 2026 च्या अखेरीस सोन्याचा दर 6,000 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतो. 2027 मध्ये तो 6,300 डॉलर प्रति औंसपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, हे अंदाज असून प्रत्यक्ष दर अनेक जागतिक आर्थिक घटकांवर अवलंबून राहतील.


अमेरिकन डॉलरच्या मजबुतीचाही सोन्याच्या दरावर परिणाम होत आहे. डॉलर मजबूत झाल्यास इतर चलनांमध्ये सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ते महाग होते. त्याचबरोबर अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरासंदर्भातील निर्णय, महागाई, भू-राजकीय परिस्थिती आणि मध्यवर्ती बँकांची सोन्याची खरेदी यांचा आगामी काळात सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Bigg Boss 20 : ‘बिग बॉस 20’ची डिजिटलवर मोठी झेप ! सलमान खानचं 'ते' वक्तव्य अन् 2 कोटी व्ह्युअर्सचा टप्पा पार

Bigg Boss 20 : ‘बिग बॉस 20’ सुरू होऊन काही दिवसच झाले असले तरी या सीझनची चर्चा चांगलीच रंगली आहे. आता या चर्चेला डिजिटल

Mumbai Ganesh Visarjan 2026 : गिरगाव चौपाटीवर परदेशी पर्यटकांसाठी 'प्रेक्षक गॅलरी'; विसर्जन सोहळा पाहण्याची मिळणार संधी!

मुंबई : महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि गणेशोत्सवाचा भव्य सोहळा परदेशी पर्यटकांना जवळून पाहता यावा,

BMC Notice : अभिनेता अजय देवगण मोठ्या अडचणीत! मुंबईतल्या अलिशान बंगल्यावर थेट BMC ची कारवाई, नक्की काय घडलं?

मुंबई : अभिनेता अजय देवगणच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्यावरून नवा वाद समोर आला आहे. कपोळ को- ऑपरेटिव्ह हाउसिंग

शुभमन गिलचं नशिब चांगलं आहे, कारण...! प्रशिक्षक गौतम गंभीर असं का म्हणाला?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 27 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या वनडे मालिकेसाठी टीम

CM Devendra Fadnavis : कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ देणार - मुख्यमंत्री फडणवीस यांची वाशिममध्ये घोषणा

कोरड्या दुष्काळाचा जीआर काढणार, पीकविम्याचे प्रश्नही सोडविण्याचे आश्वासन वाशिम : दुष्काळाने शेतीचे कंबरडे

Samastipur Crime News : पुन्हा एकदा 'जमुई कांड'! अल्पवयीन मुलीचा भरदिवसा छळ, व्हिडिओ व्हायरल होताच 4 आरोपी अटकेत

बिहार : बिहारमधील जमुई कांड ताजं असतानाच पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे. भरदिवसा एका अल्पवयीन मुलीचा छळ