नवी दिल्ली: शैक्षणिक संस्थांसाठी इन्फ्रास्ट्रक्चरल मॅनेजमेंट सेवा पुरवणाऱ्या एलिवेट कॅम्पसेस लिमिटेड (Elevate Campuses Limited) कंपनीचा २,१०० कोटी रुपयांचा बहुप्रतिक्षित आयपीओ (IPO) आजपासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये गुंतवणूकदारांना २५ सप्टेंबरपर्यंत बोली लावता येणार आहे. लाँचिंगच्या पहिल्याच दिवशी दुपारी १.३० वाजेपर्यंत या आयपीओला ११ टक्के सब्स्क्रिप्शन मिळाले होते.(IPO Investment)
नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. रेटिंग एजन्सी मूडीज (Moody's) नंतर आता फिच रेटिंग्स (Fitch Ratings) ने ...
आयपीओचा तपशील आणि प्राईस बँड
या आयपीओसाठी कंपनीने ३४३ ते ३६२ रुपये प्रति शेअर असा प्राईस बँड निश्चित केला आहे. या इश्यूचा लॉट साइज ४१ शेअर्सचा आहे. (Elevate Campuses IPO 2026)
किमान गुंतवणूक: किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investors) किमान एका लॉटसाठी म्हणजेच ४१ शेअर्ससाठी बोली लावू शकतात, ज्यासाठी १४,८४२ रुपये गुंतवावे लागतील.
कमाल गुंतवणूक: किरकोळ गुंतवणूकदार जास्तीत जास्त १३ लॉटमध्ये ५३३ शेअर्ससाठी १,९२,९४६ रुपये गुंतवून बोली लावू शकतात.
या संपूर्ण आयपीओअंतर्गत १ रुपया दर्शनी मूल्य (Face Value) असलेले एकूण ५,८०,११,०४९ नवीन शेअर्स जारी केले जात आहेत. यामध्ये क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी (QIB) ७५ टक्के, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी १० टक्के आणि बिगर-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्ससाठी (NII) १५ टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. या इश्यूचे व्यवस्थापन जेएम फायनान्शियल लिमिटेड करत असून, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड हे रजिस्ट्रार आहेत.(IPO Investment)
Nashik Accident News : दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या ...
महत्त्वाच्या तारखा
बोली लावण्यासाठी अंतिम तारीख: २५ सप्टेंबर
शेअर्स अलॉटमेंट: २८ सप्टेंबर
डिमॅट अकाउंटमध्ये क्रेडिट: २९ सप्टेंबर
स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग: ३० सप्टेंबर (बीएसई आणि एनएसईवर अपेक्षित)
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत भाजपा आमदार विक्रम पाचपुते यांनी विद्यार्थ्यांना राजकीय ...
कंपनीची वित्तीय स्थिती
सेबीकडे सादर करण्यात आलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार (RHP), कंपनीची आर्थिक स्थिती सातत्याने सुधारत आहे:
निव्वळ नफा: २०२३-२४ मध्ये ३९.६९ कोटी रुपये असलेला नफा २०२४-२५ मध्ये ४९.७४ कोटींवर पोहोचला आणि २०२५-२६ मध्ये तो १७३.७६ कोटी रुपयांवर झेपावला.
महसूल: याच कालावधीत कंपनीचा महसूल ३६२.६१ कोटींवरून वाढून मागील आर्थिक वर्षात ६०३.३९ कोटी रुपयांवर पोहोचला.(IPO Investment)
मात्र, याच काळात कंपनीवरील कर्जाचा बोजा ९८४.७१ कोटींवरून वाढून ४,१२०.५३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच कंपनीचे ईबीआयटीडीए (EBITDA) २०२५-२६ मध्ये ५४५ कोटी रुपयांवर पोहोचले असून, नेटवर्थ ९५६.२९ कोटी रुपये नोंदवले गेले आहे.