Iran-US-Israel War : इराणच्या ‘हिट लिस्ट’वर अमेरिकन टेक कंपन्या, गुगल-अमेझॉनसह मोठ्या कंपन्यांना धोका

मध्यपूर्वेत सुरू असलेला अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता अधिक धोकादायक टप्प्यावर पोहोचत असल्याचे संकेत मिळत आहेत. इराणने अलीकडेच एक नवी ‘हिट लिस्ट’ जाहीर केली असून त्यात अमेरिकेच्या प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांच्या कार्यालयांना लक्ष्य केले जाऊ शकते, असे म्हटले आहे.


या यादीत गुगल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, एनव्हिडिया, आयबीएम, ओरॅकल आणि पॅलांटीर यांसारख्या मोठ्या टेक कंपन्यांचा समावेश आहे. इस्रायल, दुबई, अबू धाबी तसेच पश्चिम आशियातील इतर भागांमध्ये असलेल्या या कंपन्यांच्या कार्यालयांवर आणि तंत्रज्ञान पायाभूत सुविधांवर संभाव्य हल्ल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित कंपन्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


इराणच्या तस्निम या वृत्तसंस्थेने ही यादी प्रसिद्ध केली आहे. त्यांच्या अहवालानुसार, इस्रायलने लष्करी उद्देशांसाठी या कंपन्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याचा आरोप इराणने केला आहे. त्यामुळेच या कंपन्या आता इराणच्या निशाण्यावर असल्याचे सांगितले जात आहे.


या कंपन्यांची कार्यालये आणि क्लाउड-सेवा पायाभूत सुविधा इस्रायलमधील विविध शहरांसह आखाती देशांमध्येही आहेत. तस्निमच्या निवेदनानुसार, सध्याचे युद्ध हळूहळू पायाभूत सुविधांवर केंद्रित होत असून संभाव्य लक्ष्यांची व्याप्ती वाढत चालली आहे.


दरम्यान, गेल्या आठवड्यात बहरीनमधील अमेझॉन वेब सर्व्हिसेस (AWS) च्या डेटा सेंटरवर इराणी ड्रोनद्वारे हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला. संयुक्त अरब अमिरातीतील दोन अन्य AWS पायाभूत सुविधांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यांमुळे आग लागणे, सेवा खंडित होणे आणि आपत्कालीन प्रणाली ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण झाली.


मीडिया अहवालांनुसार, अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करी कारवायांमध्ये तांत्रिक सहाय्य देत असल्याच्या आरोपांमुळे या डेटा सेंटर्सना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.