इराणचा दुबईमध्ये पुन्हा एकदा ड्रोन हल्ला; दुबईच्या अधिकाऱ्यांकडून तातडीची कारवाई

संयुक्त अरब अमिरातीतील दुबई येथे ड्रोन हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. दुबई प्रशासनाने गुरुवारी या हल्ल्याची अधिकृत माहिती दिली. एका वार्ताहराने शहरातील डाउनटाउन भागात स्फोटांचे आवाज ऐकल्याचे सांगितले आहे. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आखाती देशही या संघर्षात अडकत असून यूएईसह इतर आखाती देशांवरही हल्ले होत आहेत.


दुबई सरकारच्या मीडिया कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, “अल वदा’अ परिसरात घडलेल्या ड्रोन घटनेवर दुबईचे अधिकारी तातडीने कारवाई करत आहेत.” पुढे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे की, “या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही. एका वार्ताहराने 'अल वदा’अ या निवासी भागाच्या वर धूर उठताना पाहिल्याचेही सांगितले.


अमेरिका आणि इस्रायल यांनी २८ फेब्रुवारी रोजी इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या संघर्षामुळे आखाती प्रदेशातील देशांना इराणच्या हल्ल्यांचा सर्वाधिक फटका बसला आहे. आखाती देशांवरील हल्ल्यांमध्ये आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये अमेरिकेचे सात सैनिक आणि ११ सामान्य नागरिकांचा समावेश आहे.


ब्रिटिश सैन्याच्या ‘युनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स सेंटर’च्या माहितीनुसार, दुबईतील हल्ल्यापूर्वी गुरुवारीच फारसी आखातात दुबईच्या किनाऱ्याजवळ एका कंटेनर जहाजावर अज्ञात वस्तूने हल्ला करण्यात आला होता, ज्यामुळे जहाजाला आग लागली. मात्र जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे