Railway LPG Shortage : इंधन संकटाचा रेल्वे खानपान सेवेला फटका; वडापाव-समोसे मेन्यूमधून गायब होणार?

मुंबई : एलपीजीच्या सध्याच्या कमतरतेचा परिणाम रेल्वे स्थानकांमधील रेस्टॉरंट्सवर होऊ लागला आहे, अनेक खाद्यपदार्थ विक्रेत्यांना गॅस पुरवठ्यात घट झाल्यामुळे नियमित कामकाज सुरू ठेवण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे.


पश्चिम आशियातील तणावामुळे व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) सारख्या मोठ्या स्थानकांवरील खाद्यान्न स्टॉल्सवर वडापाव आणि समोसे मिळणे कठीण झाले आहे.



लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये ताज्या अन्नाऐवजी तयार पाकिटे :


आयआरसीटीसीच्या (IRCTC) शिवडी येथील क्लाउड किचनमधून दररोज मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ४,५०० प्रवाशांसाठी जेवण तयार केले जाते. मात्र, गॅसअभावी ताज्या अन्नाच्या उत्पादनावर मर्यादा आल्या आहेत. याचा परिणाम वंदे भारत, राजधानी आणि तेजस एक्सप्रेससारख्या प्रीमियम गाड्यांवर झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राजधानी एक्सप्रेससारख्या गाड्यांच्या पेंट्री कारमध्ये आता ‘रेडी-टू-ईट’ (Ready-to-Eat) अर्थात तयार अन्नाचा साठा ठेवला जात आहे. ताज्या जेवणाची कमतरता भासल्यास प्रवाशांना हे पर्याय दिले जातील.



मुंबई लोकलच्या प्रवाशांची मोठी गैरसोय :


मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्सवर तळलेले पदार्थ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅसची गरज लागते. एलपीजी टंचाईमुळे आता वडापाव, समोसा आणि ब्रेड पकोडा यांसारखे लोकप्रिय पदार्थ गायब होण्याची चिन्हे आहेत. पश्चिम रेल्वेच्या ४६० हून अधिक आणि मध्य रेल्वेच्या १९४ स्टॉल्सवर ही समस्या जाणवत आहे. रेल्वे प्रशासनाने आता विक्रेत्यांना गॅसऐवजी इंडक्शन (Induction) आणि मायक्रोवेव्ह (Microwave) सारख्या विद्युत उपकरणांचा वापर करून अन्न गरम करण्याचे किंवा बनवण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक