सनरायजर्स लीड्सच्या काव्या मारनने पाकिस्तानच्या अबरार अहमदला संघात घेतल्याने समाज माध्यमावर संताप

मुंबई: काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायजर्स लीड्स या टीमनं द हंड्रेड २०२६ च्या ऑक्शनमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा फिरकीपटू अबरार अहमद याला संघात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. द हंड्रेडमध्ये आयपीएलशी संबंधित संघांच्या फ्रँचायजीकडून पाकिस्तानी खेळाडूंवर बोली लावली जाणार नसल्याची चर्चा होती. परंतु, प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. त्यामुळे काव्या मारन आणि सनरायजर्स लीड्सवर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आयपीएलमधील काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएलमधून काढून टाका, अशी मागणी देखील करण्यात येत आहे. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे.


पाकिस्तानी खेळाडू अबरार अहमदला विकत घेतल्यामुळे सनरायझर्सला सोशल मीडियावर तीव्र टीकेचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर काव्या मारन आणि सनरायझर्स लीड्स चांगलेच ट्रेंड होत आहे. परंतु 'X' (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सनरायझर्स लीड्सचे खाते निलंबित करण्यात आले आहे. जेव्हा कोणी हे खाते उघडण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिथे "Suspended" (निलंबित) अशी सूचना दिसते. या संदर्भात 'X' किंवा फ्रँचायझी या दोघांपैकी कोणीही अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.



अबरार अहमदवर काव्या मारनने किती कोटींची बोली लावली?


अबरार अहमदला सनरायजर्स लीड्सनं १९०००० पौंड म्हणजेच जवळपास २.३४ कोटी रुपयांना खरेदी केलं. पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमद याच्यावर सुरुवातीला ट्रेंट रॉकेटसनं बोली लावली होती. त्यांनी अबरार अहमदसाठी एक लाख पौंड इतकी बोली लावली होती. यानंतर सनरायजर्स लीडसनं १९०००० पौंड बोली लावत अबरार अहमदला संघात घेतलं.





उस्मान तारिकवरही लागली बोली


'द हंड्रेड'च्या लिलाव यादीमध्ये एकूण १३ पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश होता. त्यापैकी केवळ दोन खेळाडूंसाठी बोली लावली गेली. अबरार अहमदव्यतिरिक्त, 'मिस्ट्री स्पिनर' उस्मान तारिकसाठीही बोली लावली गेली होती. अखेरीस, उस्मानला बर्मिंगहॅम फिनिक्स या फ्रँचायझीने आपल्या संघात घेतले. त्या फ्रँचायझीचा भारताशी कोणताही संबंध नाही. शाहीन आफ्रिदीने यापूर्वीच आपले नाव या लिलावातून मागे घेतले होते.



अबरार अहमदची कारकीर्द


२७ वर्षीय अब्रार अहमदने पाकिस्तानसाठी ३८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर ५२ विकेट्स आहेत. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत, त्याने ६.६७ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे. त्याच्या एकूण टी-२० क्रिकेट कारकिर्दीचा विचार करता, त्याने ८४ सामन्यांमध्ये १०९ विकेट्स पटकावल्या आहेत.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून