इराण विरूद्धच्या युद्धात अमेरिकेने दोन आठवड्यात गमावली चार विमानं

वॉशिंग्टन डीसी : इराण विरूद्धच्या युद्धात अमेरिकेने दोन आठवड्यात चार विमानं गमावली आहेत. यूएस आर्मीचे हवेतल्या हवेत इंधन भरण्याचे केसी १३५ स्ट्रॅटोटँकर हे विमान इराकमध्ये गुरुवारी कोसळले. यूएस सेंट्रल कमांडने विमान कोसळल्याचे सांगितले. हे विमान इराकच्या पश्चिमेकडील भागात कोसळले. अमेरिकेने विमान कोसळण्याचे कारण जाहीर केलेले नाही. पण इराकमधील इराण समर्थक असलेल्या एका सशस्त्र गटाने विमान पाडल्याचा दावा केला आहे.


काय आहे केसी १३५ स्ट्रॅटोटँकर ?


केसी १३५ स्ट्रॅटोटँकर हे १९५० - ६० च्या दशकाच्या सुरुवातीला बोईंगने बनवले होते. ते अमेरिकन सैन्याच्या हवेतल्या हवेत इंधन भरण्याच्या ताफ्यासाठी एक आधारस्तंभ राहिले आहे आणि विमानांना उतरण्याची आवश्यकता न पडता मोहिमा पार पाडण्यास मदत करण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचे आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार अमेरिकेच्या हवाई दलाकडे ३७६ केसी-१३५ विमाने होती, ज्यात १५१ सक्रिय, १६३ एअर नॅशनल गार्डमध्ये आणि ६२ एअर फोर्स रिझर्व्हमध्ये होती. अमेरिकेच्या नौदलाच्या वेबसाईटनुसार एका केसी १३५ स्ट्रॅटोटँकरची किंमत १९९८ मध्ये ३९.६ दशलक्ष डॉलर होती. सध्याच्या महागाईच्या निर्देशांकाचा विचार करता हे विमान ७९.६ दशलक्ष डॉलर होते. एका केसी १३५ स्ट्रॅटोटँकरमधून ८३ हजार पौंड मालाचे वहन करणे शक्य आहे. हे विमान हवेतल्या हवेत इंधन भरण्यासाठी तसेच युद्धभूमीवर उडते रुग्णालय आणि उडती रुग्णवाहिका अशा दोन्ही स्वरुपात वापरण्याची सोय आहे.


पश्चिम इराकमध्ये विमान कोसळण्याआधी केसी १३५ स्ट्रॅटोटँकर हे २०१३ मध्ये किर्गिस्तानमधील मानस विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच कोसळले होते. ताज्या घटनेत इराकमधील इराण समर्थक असलेल्या एका सशस्त्र गटाने विमान पाडल्याचा दावा केला आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे