Iran-US-Israel War : 'आम्ही युद्ध थांबवू पण...'; युद्ध थांबवण्यासाठी इराणने ठेवल्या तीन अटी

मध्य पूर्वेत इराण आणि अमेरिका-इस्त्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज १४ वा दिवस आहे. ही लढाई प्रत्येक दिवसागणिक अधिक तीव्र होत चालली आहे. आजही दोन्ही बाजूंनी जोरदार क्षेपणास्त्र, बॉम्ब आणि तोफगोळ्यांचा मारा सुरू आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील युद्ध लवकरच संपण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की इराणमध्ये आता काहीही उरलेले नाही आणि अमेरिकेने आपली सर्व लष्करी उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. दुसरीकडे, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी युद्ध समाप्त करण्यासाठी तीन महत्त्वाच्या अटी मांडल्या आहेत.


इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील त्यांच्या अधिकृत हँडलवर पोस्ट करत म्हटले “रशिया आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी संवाद साधताना मी प्रदेशात शांततेसाठी इराणची बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून सुरू करण्यात आलेले हे युद्ध संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे इराणच्या वैध अधिकारांना मान्यता देणे, नुकसानभरपाईचा भरणा करणे आणि भविष्यातील आक्रमणांविरोधात ठोस आंतरराष्ट्रीय हमी देणे.”


मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एक मोठा दावा केला आहे. ट्रम्प यांनी म्हटले की इराणमधील लष्करी तळ आणि लक्ष्यांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्यात आले असून त्यामुळे आता इराणमध्ये काहीही शिल्लक राहिलेले नाही. त्यांच्या वायुसेनेपासून ते हवाई संरक्षण व्यवस्थेपर्यंत सर्व काही निष्प्रभ करण्यात आले आहे आणि अमेरिका जेव्हा इच्छितील तेव्हा हे युद्ध संपवू शकते. मात्र, युद्ध समाप्त करण्यासाठी अमेरिका नेमकी कोणती रणनीती अवलंबणार आहे, याबाबत त्यांनी स्पष्ट माहिती दिली नाही. तसेच त्यांनी असा आरोप केला की इराणने गेल्या ४७ वर्षांत जगाला मोठे नुकसान पोहोचवले असून आता त्याची किंमत चुकवावी लागत आहे.


दरम्यान, इस्त्रायलचे हिजबुल्लाहच्या ठिकाणांवरील हल्ले सुरूच आहेत. इस्त्रायलने लेबनानची राजधानी बेरूत येथे जोरदार हवाई हल्ले केले आहेत. इस्त्रायली संरक्षण दलाच्या (आयडीएफ) हवाई कारवाईत बेरूतच्या दक्षिणेकडील बुर्ज अल-बराजनेह परिसराचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर बेरूतमधील निवासी भागांत जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले आणि अनेक घरांना आग लागली.लेबनानच्या आरोग्य मंत्रालयानुसार, २ मार्चपासून सुरू असलेल्या इस्त्रायली हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ८६ मुलांसह आणि ४७ महिलांसह ६०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून १,४४४ जण जखमी झाले आहेत.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.