North Korea Ballistic missile : इराण - अमेरिका युद्धात उत्तर कोरियाची एन्ट्री ?

- उत्तर कोरियाने सोडल्या १० बॅलेस्टिक मिसाईल


इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्षाचा आजचा १५ वा दिवस आहे. या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. खनिज तेलाचे दर प्रचंड वाढले आहेत. दरम्यान, इराण युद्धात माघार घेत नसल्याने आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये सैन्य घुसवण्याची तयारी सुरु केली आहे. अमेरिकेचे २५०० मरिन कमांडो आणि एक एम्फिबियस असॉल्ट शिप पश्चिम आशियाच्या दिशेने रवाना झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये अमेरिका इराणमध्ये एखादी मोठी लष्करी कारवाई करण्याची शक्यता आहे.


अशातच आता उत्तर कोरिया देखील युद्धात उतरणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. उत्तर कोरियाच्या लष्कराने शनिवारी पूर्व समुद्रकिनाऱ्यावरुन १० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे (Ballistic missile) डागली आहेत. त्यामुळे आता या युद्धात उत्तर कोरिया देखील उडी मारणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.


मात्र उत्तर कोरियाकडून ही केवळ क्षेपणास्त्रांची चाचणी असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर कोरिया आणि जपानने १० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


दक्षिण कोरियाकडूनही उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यात आल्याच्या वृत्ताबाबत भाष्य करण्यात आले आहे. उत्तर कोरियाने पूर्वे समुद्रकिनाऱ्यावरुन अज्ञात वस्तू प्रक्षेपित ( संभाव्य क्षेपणास्त्र चाचणी) केल्याचे दक्षिण कोरियाचे म्हणणे आहे. जपान या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. उत्तर कोरियाने सोडलेली क्षेपणास्त्रे समुद्रात पडल्याची माहिती जपानकडून देण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Floods : नेपाळच्या महापुरात बँक बुडाली, पण आत सापडला कोट्यवधींचा खजिना; ५० कोटींचे सोने, रोकड आणि चांदी सुरक्षित बाहेर

काठमांडू : नेपाळमध्ये भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. पूर आणि

PM Modi SCO Summit : बिश्केकमध्ये पंतप्रधान मोदींची पुतीन, पेझेश्कियन यांच्याशी भेट; वर्ल्ड नोमॅड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यालाही उपस्थिती

बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असून, बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन

US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचा पलटवार; जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला, होर्मुजमध्ये तणाव वाढला

तेहरान : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा चिघळला आहे. अमेरिकेने इराणच्या लारक बेटावरील दोन रॉकेट

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी

Switzerland Rave Shooting : स्वित्झर्लंडमध्ये रेव्ह पार्टीत अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

बर्न : स्वित्झर्लंडमधील आराऊ शहरात रविवारी पहाटे रेव्ह पार्टीदरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एका