Borivali National Park Toy Train : वनराणी इज बॅक! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आजपासून 'वनराणी' पुन्हा धावणार!

मुंबई : बोरिवलीच्या निसर्गरम्य संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आजपासून 'वनराणी' पुन्हा एकदा पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाली असून, उद्यानाचा कोपरा न कोपरा आता पुन्हा या ट्रेनच्या आवाजाने दुमदुमणार आहे. गेल्या ४ वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे आणि चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे बंद असलेली ही सेवा आता नव्या रुपात भाविकांच्या आणि पर्यटकांच्या भेटीला येत आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते आज दुपारी १२ वाजता या ट्रेनला हिरवा कंदिल दाखवण्यात येईल.



नव्या 'वनराणी'ची खास वैशिष्ट्ये



यावेळी उद्यानात एक नाही तर दोन वेगवेगळ्या प्रकारच्या टॉय ट्रेन्स पर्यटकांचे मनोरंजन करणार आहेत. अहमदाबादहून दाखल झालेली ही ट्रेन आधुनिकतेचा नमुना आहे. याचे छप्पर पारदर्शक असून खिडक्या मोठ्या आहेत, ज्यामुळे पर्यटकांना ट्रेनमध्ये बसूनही जंगलाच्या सौंदर्याचा मनसोक्त आनंद घेता येईल. ही ट्रेन पूर्णपणे मोकळी (Open) असल्यामुळे निसर्गाच्या अगदी जवळ असल्याचा अनुभव पर्यटकांसाठी रोमांचकारी ठरेल. विशेषतः मुलांना ही ट्रेन भुरळ घालणारी ठरणार आहे.



बंद पडलेली सेवा आणि पुनरुज्जीवन


२०२१ मध्ये आलेल्या 'तौक्ते' चक्रीवादळामुळे उद्यानातील रेल्वे मार्गाचे आणि इंजिनचे मोठे नुकसान झाले होते, परिणामी ही सेवा थांबवण्यात आली होती. मात्र, उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी या प्रकल्पात वैयक्तिक रस घेऊन पाठपुरावा केल्यामुळे या ऐतिहासिक टॉय ट्रेनचे पुनरुज्जीवन होऊ शकले आहे. या नवीन रेल्वे प्रणालीची सर्व चाचणी पूर्ण झाली असून, ती आता प्रवाशांसाठी सुरक्षित आणि सज्ज आहे.

Comments
Add Comment

Mumbai News: सोनं तस्करीची भन्नाट शक्कल! खाद्यपदार्थांच्या पाकिटांत लपवलं 9.40 किलो सोनं; तिघे अटकेत

मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (Directorate of Revenue Intelligence- DRI) मुंबई विभागाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज

DCM Eknath Shinde News: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई: “संकटाच्या प्रत्येक काळात महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. आताही दुष्काळी

रोजगार महाकुंभाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २९ सप्टेंबरला उद्घाटन, राज्यभरात विविध ठिकाणी आयोजन; ‘लाडक्या बहिणीं’साठी स्वतंत्र रोजगार मेळावा

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी येत्या २९ सप्टेंबरला ‘पंडित दीनदयाळ

महाउत्सवाची सांगता! 22 तासांची भव्य मिरवणूक अन् अखेरचा निरोप; लालबागच्या राजाच्या विसर्जनाला नेमका उशीर का होत आहे?

मुंबई : लाडक्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी रविवारी गिरगाव चौपाटीवर जनसागर लोटला असून, नवसाला

Prabhadevi Accident : प्रभादेवीत मोठी दुर्घटना! विसर्जन मिरवणुकीत कार घुसली; नेमकं काय घडलं?

Mumbai : मुंबईत अनंत चतुर्दशी व गणेशोत्सवाच्या विसर्जन सोहळ्यादरम्यान एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी बाप्पाला निरोप!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी लाडक्या बाप्पाला पर्यावरणपूरक पद्धतीने निरोप