मुंबई: “संकटाच्या प्रत्येक काळात महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. आताही दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनाच आमचे संपूर्ण ...
विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबई विमानतळ सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर पथकाच्या मदतीने २३ सप्टेंबरच्या पहाटे तीन भारतीय प्रवाशांना अडवले. या प्रवाशाच्या सामानाची तपासणी केली असता, अधिकाऱ्यांना सोन्याची भुकटी मिसळलेले तब्बल ३३.५० किलो वजनाचे अन्नपदार्थ आढळून आले. त्या प्रवाशाने सोन्याची भुकटी दुधाची पावडर, ओट्स, विविध प्रकारचे पीठ, न्युटेला आणि नारळाच्या दुधाची पावडर यांसारख्या अनेक खाद्यपदार्थांच्या पाकिटांमध्ये लपवलेले होते. प्रवाशाने लावलेली ही अनोखी शक्कल पाहून महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांचे, विमानतळ प्रशासनाचे आणि पोलिसांचेही डोळे चक्रावून गेले आहेत. कोणालाही संशय येऊ नये, यासाठी प्रवाशाने ही अनोखी शक्कल वापरली आहे.
👉 DRI seizes 9.40 kg foreign-origin gold worth around Rs. 15 crore at Mumbai airport; three arrested
👉 Gold powder ingeniously blended with food products like milk powder, oats, rice flour and cake mix
Read more ➡️ https://t.co/wS2EsFR2ty#DRIAtWork pic.twitter.com/vVapUT2Dcu
— Ministry of Finance (@FinMinIndia) September 25, 2026
डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबईवरून आलेल्या या तिन्ही प्रवाशांनी कस्टम ड्युटी भरायला न लागू नये यासाठी विचित्र पद्धतीने ते सोनं भारतात घेऊन आले. सोन्याची भुकटी त्याच रंगाच्या, पोताच्या आणि घट्टपणाच्या खाद्यपदार्थांमध्ये मिसळण्यात आली होती. त्यानंतर पाकिटांमधील वस्तू वेगळ्या करून त्यांची तपासणी करण्यात आली, ज्यानंतर 9.40 किलो विदेशी सोने जप्त करण्यात आले. सुमारे 14.81 कोटी रुपये किमतीचे हे सोने, सीमाशुल्क कायदा, १९६२ च्या संबंधित तरतुदींनुसार जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान, त्या तिन्ही प्रवाशांनी एकाच सोने-तस्करीच्या टोळीसाठी कुरिअर म्हणून काम करत असल्याची कबुली दिल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे, डी.आर.आय.ने या टोळीची ओळख पटवली असून, आता त्यांच्या व्यापक नेटवर्कची चौकशी केली जात आहे.
मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी येत्या २९ सप्टेंबरला ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ ...
सोनं परदेशातून भारतात आणून देणाऱ्या एजंटचाही शोध घेतला जात आहे, त्याचीही चौकशी सध्या सुरू आहे. डीआरआय कडून प्रत्येक खाद्यपदार्थांची, पावडर असलेल्या सामानांची आणि बॅगेची चौकशी केली जात आहे. भारतात सोनं आणण्यासाठी ज्या पद्धतीने शक्कल वापरली आहे, त्या पद्धतीने डीआरआयकडून चौकशी केली जात आहे. मुंबईत सोने आल्यानंतर ते स्वीकारण्यात किंवा त्याचे वितरण करण्यात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींच्या भूमिकेचीही तपास अधिकारी चौकशी करत आहेत. या कारवाईमुळे सोने लपवण्याची एक नवीन पद्धत उघडकीस आली आहे, ज्यामध्ये सोनं, चांदीची भुकटी करून ती अगदी सहज पद्धतीने सील बंद पॅकेटच्या माध्यमातून चतुराईने बाळगली जात आहे. या टोळीने इतर तस्करीच्या कारवायांमध्येही याच पद्धतीचा वापर केला होता का, याचीही तपास यंत्रणा करत आहे. सोने-तस्करीची नेटवर्क शोधून काढणे आणि विमानतळावरील तपासणी व सीमाशुल्क तपासणी टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती ओळखणे, या DRI च्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा हा जप्तीचा भाग आहे.