मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी बाप्पाला निरोप!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी लाडक्या बाप्पाला पर्यावरणपूरक पद्धतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. 'बाप्पाचे विसर्जन म्हणजे वियोग नाही, तर नव्या आशा आणि संकल्पांसह पुढे जाण्याचा नवा आरंभ आहे,' अशा भावना व्यक्त यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी लाडक्या बाप्पाला पर्यावरणपूरक पद्धतीने निरोप देण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी विसर्जन प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. "निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी..." या आर्त ओळी त्यांनी या निमित्ताने सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. विसर्जनापूर्वी बाप्पाची पारंपरिक पद्धतीने उत्तरपूजा करण्यात आली. त्यानंतर 'वर्षा'च्या आवारातच घरच्या घरी कृत्रिम तलावात बाप्पाचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. पत्नी अमृता फडणवीस, कुटुंबातील इतर सदस्य आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला.


गेल्या काही दिवसांपासून बाप्पाच्या भक्तीत रमलेले मन आज निरोपाच्या क्षणी भरून आले. पण बाप्पाचे विसर्जन म्हणजे वियोग नाही, तर नव्या आशा, नव्या संकल्पांसह पुढे जाण्याचा एक नवा आरंभ आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या. बाप्पाची कृपा आणि आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांवर राहोत, जनतेच्या जीवनातील सर्व चिंता-विघ्ने दूर होवोत, अशी मनोभावे प्रार्थना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.





गणेशोत्सवाच्या 10 दिवसांत अनेक दिग्गज नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी 'वर्षा' निवासस्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट देऊन बाप्पाची आरती केली होती.
Comments
Add Comment

मुंबईतील १० अग्निशमन केंद्र बनणार ऊर्जेत स्वावलंबी, भायखळा मुद्रणालयासाह १० अग्निशमन केंद्रांवर सौर ऊर्जा प्रकल्प साकारणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने आता वीज बचतीचा मार्ग अवलंबवण्यास सुरुवात केली असून देशाचे

मुंबई फटाक्यांनी पेटतेय! एकाच दिवसांमध्ये फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या १३७ घटना

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईत फटाक्यांच्या आतषबाजीवर न्यायालयाने निर्बंध घातलेले असताना त्यानुसार महापालिका

महापालिकेच्या विधी खात्यातील ३५ पदे कायमचीच केली रद्द, कनिष्ठ कायदा अधिकारीपासून ते फलक परिचरपर्यंतच्या पदांचा समावेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या विधी खात्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात असून महापालिका

प्रॉपर्टी कार्डवर अखेर मुंबई महापालिकेची नावे चढली, तब्बल १८९० भूभागांच्या मालमत्ता कार्डवर नाव नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या ताब्यात आज अनेक भूखंड असले तरी यातील बहुतांशी भूखंडांच्या मालमत्ता

IRCTC कडून मुंबईहून ‘टेम्पल ट्रेल्स ऑफ दक्षिण’ भारत गौरव विशेष पर्यटन रेल्वे चालवणार, अशी आहे योजना

मुंबई: भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (IRCTC), पश्चिम विभाग, मुंबईतर्फे भारत गौरव विशेष पर्यटन

700 ग्रॅम बाळाचं वजन 3.3 कि.ग्रॅमवर नेलं; केईएम हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी बाळाला दिलं जीवनदान

मुंबई: मुंबईतील केईएम रूग्णालयातील डॉक्टरांनी एका बाळाला जीवनदान दिले आहे. आई 7 महिन्यांची गर्भवती असतानाच