Missing Link' Project: मुंबई-पुण्यातील अंतर कमी होणार, 'मिसिंग लिंक'चं काम पूर्ण; लवकरच प्रवाशांसाठी खुला

मुंबई: बहुप्रतीक्षित मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आहे. या प्रोजेक्टशी संबंधित असलेल्या एक इंजिनियरने सोशल मिडिया एक्सवर एक व्हिडिओ शेअर करीत याबाबत माहिती दिली. मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प इंजिनियरिंगचा अद्भूत नमुना आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर मुंबई-पुण्यातील अंतर तब्बल ६ किलोमीटरपर्यंत कमी होईल. इतकच नाही तर २५ ते ३० मिनिटांची प्रवासाचा वेळ वाचेल. मिसिंग प्रकल्पाची एकूण लांबी १३.३ किलोमीटर इतकी आहे. यामध्ये ६५० मीटर लांब केबल ब्रिजचा समावेश आहे. याची एकूण उंची १८२ मीटर (६० मजली इमारत) आहे.


सतीश माने नावाच्या एका वापरकर्त्याने यासंदर्भातील व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम पूर्ण झाल्याचं त्यांनी एक्सवर माहिती दिली. माने यांच्या पोस्टनुसार, मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम १२ मार्चला पूर्ण झालं. सूत्रांच्या माहितीनुसार, या मिसिंग लिंक प्रकल्पाचा शुभारंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातून होऊ शकतं. मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पात टायगर व्हॅलीच्यावर एक ६५० मीटर लांब केबल-स्टेड पुल तयार करण्यात आला आहे. या खांबांची उंची साधारण १८२ मीटर असून ज्यामुळे हा पुल भारतातील सर्वात उंच रस्ते पुलांपैकी एक ठरतो. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने याची उभारणी केली आहे.



कधी सुरू होणार मिसिंग लिंक?



काही दिवसांपूर्वी आलेल्या अपडेटनुसार, या प्रकल्पाचं ९८ टक्के काम पूर्ण झालेलं आहे. १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) रोजी हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प तयार करण्यासाठी साधारण ६,६९५ कोटींचा खर्च झाला आहे. या प्रकल्पात दोन मुख्य बोगद्यांचा समावेश आहे. एक बोगदा साधारण ८.९ किलोमीटर लांब आहे. हा देशातील सर्वात लांब बोगद्यांपैकी एक आहे. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर खंडाळा घाट क्षेत्रात होणारे अपघात आणि लँडस्लाइडमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका मिळेल.


खोपोली एक्झिटपासून कुसगाव (लोणावळा) पर्यंतचा कठीण आणि वळणदार घाट विभाग या लिंकमुळे दूर होईल. अलिकडेच मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एक टँकर उलटल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली तेव्हा याची अत्यंत गरज होती.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा