Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या आनंदाची बातमी, १ जूनपासून...

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात किंवा सुट्ट्यांच्या दिवसात ज्या महामार्गावर तासनतास अडकून पडावे लागते, त्या प्रवासातील सर्वात मोठे अडथळे आता दूर होणार आहेत.


गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या एका महत्त्वाच्या टप्प्याचे काम आता मार्गी लागत असून, यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे. हा बदल नेमका कुठे होणार आहे आणि कधीपासून प्रवाशांना याचा लाभ मिळेल, याची माहिती आता समोर आली आहे.


रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि इंदापूर या दोन ठिकाणच्या बायपासचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून १ जूनपर्यंत हे दोन्ही बायपास वाहतुकीसाठी खुले करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ही महत्त्वाची माहिती दिली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ही दोन शहरे वाहतूक कोंडीसाठी ओळखली जातात, मात्र आता या बायपासमुळे प्रवाशांची या त्रासातून कायमस्वरूपी सुटका होणार आहे.


माणगाव आणि इंदापूर या शहरांमधून महामार्ग जात असल्याने तिथे नेहमीच वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. विशेषतः पर्यटन हंगामात ही कोंडी प्रवाशांची सत्त्वपरीक्षा घेणारी ठरते. यावर उपाय म्हणून बायपासचे काम हाती घेण्यात आले होते, मात्र कोकण रेल्वेचा काही भाग या कामात आड येत असल्याने गती मंदावली होती. रेल्वेचे विद्युत पोल आणि इतर तांत्रिक सुविधांमुळे कामात अडथळे निर्माण झाले होते. यासंदर्भात खासदार तटकरे यांनी कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, रेल्वे प्रशासनाने हे पोल आणि सुविधा तातडीने हलविण्याचे आश्वासन दिले आहे.


१ जूनपासून वेगवान प्रवास



या बैठकीनंतर बायपासच्या कामातील सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून आता कामाला वेग आला आहे. संबंधित यंत्रणांना कामाची गती वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व काही नियोजनानुसार झाल्यास १ जूनपासून माणगाव आणि इंदापूर बायपासवरून वाहने धावू लागतील. हे दोन्ही बायपास सुरू झाल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास केवळ वेगवानच नाही, तर अधिक सुरक्षितही होणार आहे. स्थानिक नागरिकांसह कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने