Sharukh Khan : शाहरुखचा मन्नत बंगला लवकरच दिसणार नव्या स्वरुपात, सीआरझेडकडून मिळाला मोठा दिलासा

अभिनेता शाहरुख खानचा मन्नत बंगला हा जगप्रसिद्ध असून हा बंगला पाहण्यासाठी अनेकजण उत्सुकतेनं येतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शाहरुखचा मन्नत बंगला अडचणीत सापडला होता. या बंगल्याच्या बांधकामात सीआरझेड नियमांचं उल्लंघन केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पण, आता शाहरुख खानला याबाबत दिलासा मिळाला असून मन्नत बंगल्याच्या विस्ताराला सीआरझेड अर्थात किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून १९४ व्या बैठकीत ग्रीन सिग्नल मिळाला आहे.


काही महिन्यांपूर्वी शाहरुखच्या मन्नत बंगल्याच्या बांधकामावर नियमांचं उल्लंघन केल्याबाबत आक्षेप घेण्यात आला होता. मन्नत बंगल्याच्या बांधकामावेळी सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, आता सीआरझेडकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे मन्नत या बंगल्याच्या परिसरात दोन तळमजले, पहिल्या ते सहाव्या मजल्यापर्यंत बांधकाम करण्यात येणार आहे.


शाहरुखच्या मन्नत बंगल्याचे क्षेत्रफळ सुमारे २४४६.४० चौरस मीटर असून या भूखंडावर एकूण बांधकाम ४५५३.४४ चौरस मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. यापैकी एफएसआय क्षेत्र ३०२९.२० चौरस मीटर आहे. तर, उर्वरित भाग नॉन- एफएसआय स्वरुपामध्ये असून या नवीन सुधारणेमुळे जवळपास ५९६ चौरस मीटर अतिरिक्त बांधकाम करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’