ओडिशात रुग्णालयाच्या ICU ला आग, एवढ्या रुग्णांचा मृत्यू

कटक : ओडिशातील कटकच्या सरकारी एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये सोमवारी पहाटे आग लागली. रुग्णालयाच्या आयसीयूला आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत १० रुग्णांचा मृत्यू झाला आणि रुग्णालयाचे ११ कर्मचारी जखमी झाले. ही घटना रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर विभागातील आयसीयूमध्ये पहाटे २:३० ते ३:०० च्या दरम्यान घडली. ज्या आयसीयूला आग लागती त्यात गंभीर स्थितीत असलेलेल्या रुग्णांवर उपचार सुरू होते.



आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अथक परिश्रमांनंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. रुग्णालयातील अनेक रुग्णांना तसेच त्यांचा नातलगांना आणि रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. आग प्रकरणी चौकशी होणार असून दोषींवर कारवाई केली जाणार आहे.

ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि आरोग्यमंत्री मुकेश महालिंग यांनी रुग्णालयात येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. एकूण २३ रुग्णांना इतर विभागात हलवण्यात आले होते, त्यापैकी सात जणांचा हलवताना मृत्यू झाला, तर तीन जणांचा नंतर मृत्यू झाला, असे मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले. प्राथमिक तपासात आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे दिसून आले आहे. पण तज्ज्ञांच्या सहकार्याने आग प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
Comments
Add Comment

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी