विकासकामांना वेग; डोंबिवलीत वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल; जाणून घ्या हे पर्यायी मार्ग

मुंबई : डोंबिवली शहरातील काही भागात सुरू असलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. या कामांमुळे शहरातील काही महत्त्वाचे रस्ते तात्पुरते बंद करण्यात आले असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


डोंबिवलीच्या पूर्व भागात रस्ते काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने लोकमान्य टिळक रोड आणि न्यू आयरे रोड हे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातून दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.


या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सावरकर रोड, गणेश मंदिर रोड, व्ही.पी. मार्ग तसेच डॉ. राजेंद्र प्रसाद रोडमार्गे पुढे मानपाडा रोड, फतेह अली रोड किंवा आगरकर रोड या मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


याशिवाय शहरातील काही चौकांमध्येही वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. भगतसिंग रोडवरून पिंगळे चौकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना ताई पिंगळे चौकात प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातून फडके रोडकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.


दरम्यान, लोकमान्य टिळक रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी २४  तास नो पार्किंगची अट लागू करण्यात आली आहे. रस्ते काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत हे निर्बंध लागू राहण्याची शक्यता असून नागरिकांनी वाहतुकीच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.