Iran-US-Israel War : युद्ध अधिक भडकणार; इराणने केला सर्वात घातक शस्त्राचा वापर

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. शनिवारी (१४ मार्च) इराणने सौदी अरेबियातील अमेरिकेच्या महत्त्वाच्या हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात अमेरिकन हवाई दलाच्या हवेत इंधन भरणाऱ्या KC-135 स्ट्रॅटोटँकर प्रकारातील पाच विमानांचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे केवळ लष्करीच नव्हे तर संपूर्ण गल्फ (खाडी) प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा धक्का बसला आहे.


अशातच आता इराणने आपल्या भात्यातील सर्वात शक्तिशाली आणि घातक अशा शस्त्राचा वापर करून इस्रायलवर हल्ला केला आहे. युद्धाच्या १७व्या दिवशी हा हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे हे युद्ध आता आणखीनच भडकणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.



इराणकडून 'सेजिल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा' वापर :


इराणने प्रथमच आपल्या भात्यातील सर्वात घातक शस्त्र असलेल्या 'सेजिल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा' (Sejjil Ballistic Missile) वापर करून इस्रायलच्या लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. या हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील युद्धाची आग आता अधिक भडकण्याची चिन्हे आहेत.



काय आहे हे 'सेजिल' क्षेपणास्त्र?


इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) दिलेल्या माहितीनुसार, हे क्षेपणास्त्र घन इंधनावर चालणारे असून त्याचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा १३ पटीने जास्त (मॅक १३) आहे. २००० ते २५०० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र इस्रायलसह भारत, युक्रेन आणि रशियाच्या काही भागांपर्यंत पोहोचू शकते. कुराणातील 'जळणारा दगड' या संदर्भावरून याला 'सेजिल' असे नाव देण्यात आले आहे.


इराणने आपल्याकडील अनेक क्षेपणास्त्रे, सुरक्षित असून त्यांना टप्प्याटप्प्याने युद्धात वापरणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याशिवाय, मागील काही दिवसात आणखी काही क्षेपणास्त्रे विकसित केली असून त्याचा वापरही होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.



इराणची आक्रमक भूमिका, चर्चेला पूर्णविराम :


इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले आहे की, इराणने ना युद्धविरामाची मागणी केली आहे, ना अमेरिकेशी चर्चेचा कोणताही प्रयत्न केला आहे. "जोपर्यंत गरज आहे, तोपर्यंत इराण स्वतःचे संरक्षण करेल. जोपर्यंत ट्रम्प हे युद्ध बेकायदेशीर असल्याचे मान्य करत नाहीत, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही," असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.