Virat Kohli Ideal RCB team : एबीपासून स्टार्कपर्यंत दिग्गजांचा समावेश; जाणून घ्या किंग कोहलीचा ऑल टाईम फेव्हरेट आरसीबी संघ

मुंबई : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीसाठी आपली ‘ऑल-टाइम बेस्ट’ प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. या संघात त्याने स्वतःसह क्रिस गेल याला सलामीवीर म्हणून स्थान दिले आहे.


कोहली २००८ पासून आरसीबीकडून खेळत असून आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत २५९ डावांत ८६६१ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याने आपल्या ऑल-टाइम संघात स्वतःलाच सलामीवीर म्हणून स्थान दिले. विशेष म्हणजे या संघासाठी त्याने कोणत्याही खेळाडूला कर्णधार म्हणून निवडलेले नाही.


आरसीबीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये कोहलीला त्याची ऑल-टाइम प्लेइंग इलेव्हन निवडण्यास सांगण्यात आले. यात त्याने गेलला ओपनर म्हणून निवडले. गेलने आरसीबीकडून खेळताना आयपीएलमध्ये १७५ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती.


तिसऱ्या क्रमांकासाठी कोहलीने त्याचा जवळचा मित्र आणि माजी दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्स AB de Villiers याची निवड केली. तर चौथ्या क्रमांकासाठी के एल राहुल याला स्थान दिले. राहुलने आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात आरसीबीकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती.


मधल्या फळीत कोहलीने रजत पाटीदार याला संधी दिली असून यष्टिरक्षक म्हणून दिनेश कार्तिक याची निवड केली आहे.


गोलंदाजीत वेगवान अष्टपैलू म्हणून हर्षल पटेल याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच वेगवान गोलंदाज म्हणून डेल स्टेन (Dale Steyn) आणि मिचेल स्टार्क (Mitchell Starc) यांना स्थान देण्यात आले. फिरकी विभागात दिग्गज अनिल कुंबळे आणि युझवेंद्र चहल Yuzvendra Chahal यांची निवड करण्यात आली आहे.



जाणून घ्या विराट कोहलीची ऑल-टाइम आरसीबी प्लेइंग ११ :


ख्रिस गेल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, केएल राहुल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, अनिल कुंबळे, मिशेल स्टार्क, डेल स्टेन, युजवेंद्र चहल.


Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून