Iran-US-Israel War : इराणमधील भारतीय दूतावासकडून पुन्हा एकदा सूचना जारी

इराणमध्ये भू-राजकीय संकट सुरू झाल्यानंतर मध्यपूर्वेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकार तातडीने सक्रिय झाली होती. सरकारने माहिती दिली की आखाती प्रदेशातून आतापर्यंत सुमारे २०,००० भारतीय नागरिक भारतात परतले आहेत. इराणमधील भारतीय दूतावासाने यापूर्वी भारतीय नागरिकांसाठी एक अॅडव्हायजरी जारी केली होती, ज्यामध्ये दूतावासाला माहिती न देता इराणची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगण्यात आले होते. आता दूतावासाने पुन्हा एकदा अशीच सूचना जारी केली आहे.


भारतीय दूतावासाने सांगितले आहे की सर्व भारतीय नागरिकांनी तेहरानस्थित भारतीय दूतावासाशी संपर्क साधल्याशिवाय इराणमधील कोणतीही भूप्रदेशीय (जमिनीवरील) सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.दूतावास सातत्याने भारतीय समुदायाच्या संपर्कात असून जिथे गरज आहे तिथे मदतीची व्यवस्था केली जात आहे. पूर्वसूचना किंवा समन्वयाशिवाय सीमेकडे जाणे धोकादायक ठरू शकते. जे नागरिक दूतावासाला न कळवता जमिनीमार्गे इराण सोडण्याचा प्रयत्न करतील, त्यांना राहण्याची, अन्नाची तसेच इमिग्रेशनसंबंधित गंभीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. लक्षात घ्या की इराणची सीमा पार केल्यानंतर दूतावासाकडून मदत मिळू शकणार नाही.


इराणमध्ये असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी केवळ दूतावासाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा आणि कोणताही प्रवास सुरू करण्यापूर्वी दूतावासाशी नक्की संपर्क साधावा. कोणत्याही प्रश्नासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत खालील हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधता येईल: +९८ ९१२ ८१० ९११५, +९८ ९१२ ८१० ९१०२, +९८ ९१२ ८१० ९१०९, +९८ ९९३ २१७ ९३५९ , दूतावासाने ईमेल आयडीही जारी केला आहे: cons.tehran@mea.gov.in


सरकारने सांगितले की इराणमध्ये राहणारे ५५० हून अधिक भारतीय नागरिक जमिनीमार्गे आर्मेनियामध्ये पोहोचले आहेत. तसेच सुमारे ९० भारतीय नागरिक इराणमधून जमिनीमार्गे अझरबैजानमध्येही पोहोचले आहेत. या स्थलांतराची संपूर्ण व्यवस्था तेहरानस्थित भारतीय दूतावासाने केली होती. दूतावासाने नागरिकांना व्हिसा आणि आवश्यक इमिग्रेशन प्रक्रियेमध्येही मदत केली.


आर्मेनियात पोहोचलेल्या ५५० नागरिकांपैकी २८४ जण धार्मिक यात्रेसाठी इराणमध्ये गेले होते. सध्या हे सर्व नागरिक या दोन्ही देशांमध्ये सुरक्षित आहेत. त्यापैकी काही जण भारतात परतले असून उर्वरित नागरिक पुढील काही दिवसांत परतण्याची शक्यता आहे. कठीण परिस्थिती असूनही तेहरानस्थित भारतीय दूतावास पूर्णपणे कार्यरत आहे. अलीकडील काळात तेहरानबाहेर असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित शहरांमध्ये हलवण्यासाठीही दूतावासाने मदत केली आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.