Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या हत्याप्रकरणात दोन्ही महिलांच्याच एका जवळच्या मैत्रिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन्ही मृत महिला व पोलिसांनी ताब्यात घेतलेली संशयित महिला या तिघी एकमेकींच्या मैत्रिणी होत्या. कॅलिफोर्नियात एकाच अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या एका मैत्रिणीनेच दुसऱ्या दोन मैत्रिणींची हत्या केल्याचा संशय आहे. या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, या दोन महिलांची हत्या नेमक्या कोणत्या कारणांमुळे करण्यात आली, याचा शोध पोलीस घेत आहेत.


मृतांची ओळख त्रिशूरमधील मुदिक्कोड येथील अंजना हरी आणि तिरुवनंतपुरममधील केशवदासपुरम येथील ॲन मॅथ्यू अशी पटली आहे, तर हत्या केल्याचा संशय असलेली ही महिला केरळच्या कोट्टायमची रहिवासी असून तिची ओळख अनिला म्हणून पटली आहे. ती या दोन्ही महिलांची मैत्रीण होती, अशी माहिती पीडितांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.



केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनी सोमवारी या घटनेची पुष्टी केली. मंत्री गोपी यांनी सांगितले की, “सोमवारी सकाळी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला असून त्या दोन महिलांचे मृतदेह केरळला परत आणण्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.”


कुटुंबीयांच्या माहितीनुसार, ॲन मॅथ्यूची अपार्टमेंटमध्येच भोसकून हत्या करण्यात आली, तर अंजनाला कारने धडक देण्यात आली. या हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुटुंबीयांचा हा आरोप असला तरी अमेरिकन पोलिसांनी या आरोपांबाबत अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही.



Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे