पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून घरात असलेले थिनर पिऊन टाकले आहे. ही थरकाप उडवणारी घटन सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडल्याने कुटुंबात घबराट पसरली.
खेळता खेळता प्रकार घडला.


मिळालेल्या माहितीनुसार, यादव कुटुंब हे वागळे इस्टेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहेत. सोमवार सायंकाळी चिमुकला घरात खेळत होता. दरम्यान त्याच वेळी घरात एका डब्यात असलेले थिनर त्याला पाणी असल्याचे वाटले आणि त्याने ते पिऊनही टाकले. अवघ्या काही मिनिटांनी त्याच्या घशाला त्रास होऊन जळजळ होऊ लागली आणि पोटातही दुखू लागल्याने त्याने लगेच जाऊन आईला माहिती दिली.


पोराने सर्व सांगितल्यानंतर कुटुंबियांनी कोणताही उशीर न करता त्याला लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवले. सध्याच्या स्थितीला चिमुकल्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि