Sangamner : संगमनेर हादरलं! शाळकरी मुलीवर ॲसिड हल्ला

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील रणखांब परिसरात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच, वडगाव पान परिसरात एका अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संबंधित विद्यार्थिनी ही वडगाव पान येथील एका विद्यालयात शिक्षण घेत आहे.


दुपारी शाळा सुटल्यानंतर हाडके मळा येथून सायकलवरून घरी जात असताना एका अज्ञात तरुणाने तिच्यावर ॲसिड फेकले. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून स्थानिक नागरिकांनी तिला तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी तिला लोणी येथील प्रवरा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. सध्या प्रवरा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.


अल्पवयीन मुलीवरील ॲसिड हल्ल्याच्या घटनेचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस करत असून हल्लेखोराचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे वडगाव पान परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. संशयित आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण