Ahilyanagar Acid Attack Case: सहावीतील विद्यार्थीनीवर ॲसिड हल्ला प्रकरणी रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया समोर, काय म्हणाल्या?

अहिल्यानगर: अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यात सहावीत शिकाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अज्ञात तरूणाकडून ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. वडगाव पान शाळेमधील ही विद्यार्थिनी घरी जात असताना, अचानक तिच्यासमोर विकृत आला आणि त्याने थेट चिमुरडीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकलं. या हल्ल्यानंतर विकृत हल्लेखोर फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे.


शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केले असून अल्पवयीन मुलीला उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आले आहे. हल्ला करणारा आरोपी अनोळखी असल्याची पहिली प्रतिक्रिया हल्ला झालेल्या मुलीने दिली आहे. तर नातेवाईकांनी आरोपीला पकडून कडक शासन करण्याची मागणी केली आहे. दरम्यान ॲसिड हल्ल्याच्या निषेधार्थ आज ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. वडगावपानमधील ग्रामस्थांसह सर्वपक्षीय आंदोलनात सहभागी होणार आहे.



मुलीच्या उजव्या बाजूकडील डोळा व त्याच्या खालील भागावर मोठी इजा


लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. मुलीच्या उजव्या बाजूकडील डोळा व त्याच्या खालील भागावर मोठी इजा झाली आहे. या घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या असून आरोपीला पकडण्याच मोठ आव्हान पोलिसांसमोर आहे. घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी विविध पथक स्थापन करून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचं काम सुरू केलं आहे.



शाळेसाठी रोज सायकलवरुन प्रवास


घरापासून दोन किमी अंतरावर असणाऱ्या शाळेत सदर मुलगी सहावी इयत्तेत शिक्षण घेत होती. घरापासून शाळेत जाण्यासाठी रोज दोन किमी सायकवरून प्रवास करायला लागायचा. शाळेतून सायकलवरून परतत असताना मुलीवर अॅसिड हल्ला करण्यात आला. मुलीने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. घराजवळील रस्त्यावर कमी घर असल्याने आरोपीने कृत्य केल्याचं दिसून येतंय.



रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?


अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये आज सकाळी सहावीत शिकणारी एक विद्यार्थिनी शाळेनंतर घरी जात असताना तिच्यावर ॲसिड हल्ला झाला आहे. सायकल वरून घरी येणाऱ्या मुलीला रस्त्यात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवून तिच्यावर ॲसिड टाकण्यात आलं. ११.३० ते ११.४५च्या दरम्यान ही घटना घडली आहे. नागरिकांनी जखमी मुलीला डॉक्टर जम्बुकर हॉस्पिटल वडगाव पान येथे प्रथम उपचारासाठी दाखल केले नंतर लोणी इथल्या रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुलीचा चेहरा उजव्या डोळ्याचे बाजूने ७ टक्के भाजलेला आहे, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी सांगितले. जखमी असलेल्या मुलीकडे पोलिसांनी प्राथमिक विचारपूस केली आहे आणि उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. मुलीचा जबाब, प्रत्यक्षदर्शी कडून मिळालेली माहिती या सगळ्या आधारे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आधारे तपास सुरू केला आहे. मुलगी ज्या शाळेत शिकत होती तिथे ही तपास सुरू केला आहे. मी स्वतः या प्रकरणातील संगमनेर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी प्रवीण साळुंखे यांच्याशी संपर्क साधून तातडीने आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी दिल्या.

Comments
Add Comment

Tech Addiction : लहान मुलांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेण्याची वेळ आलीय? सुप्रीम कोर्टाची केंद्राला मोठी नोटीस

नवी दिल्ली : आजकाल प्रत्येक पालकाची एकच डोकेदुखी असते ती म्हणजे, "माझं मूल दिवसभर मोबाईल आणि सोशल मीडियावर काय

BMC Action: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यावर BMC चा हातोडा, नेमकं कारण काय?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या जुहू येथील बंगल्यामुळे चर्चेत आला आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC)

BMC : महापालिका निवडणुकीच्या जाहिरातबाजीवर १२.७८ लाखांचा खर्च; छपाई पेक्षा बॅनर लावणे आणि काढण्यावरच अधिकच खर्च

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या जनजागृतीसाठी लावलेल्या

Nashik : नाशिकला जागतिक स्तरावर नेण्याची तयारी ! ‘५० यस सिटीज्’ उपक्रमासाठी महापालिका प्रस्ताव देणार, सिंगापूरसोबतही करणार करार

Nashik : कुंभनगरी नाशिकच्या विकासाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण

BMC News : पाच वर्षांतच गारोडिया नगरमधील पाच रस्त्यांचा पुन्हा विकास; तब्बल साडेचार कोटी रुपये केले जाणार खर्च

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पूर्व उपनगरातील घाटकोपर (पूर्व) मधील गारोडिया नगर वसाहतील खासगी रस्त्यांचा विकास पाच

रशियन तेल खरेदीवर भारताला टॅरिफमधून सूट, ट्रम्प यांचा मोठा निर्णय, भारतासह 'या' पाच देशांना दिलासा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल आणि वायू खरेदी करणाऱ्या भारतासह पाच देशांना