मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला शेवटच्या दिवसापर्यंत कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद लाभलेला नाही. एकही कंत्राटदार पुढे आलेला नाही. त्यामुळे मिठी नदीची सफाई कशी होणार असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, मिठी नदीची सफाई न झाल्यास कुर्ल्यासह अर्धी मुंबई पाण्याखाली जाण्याची भीती वर्तवली जात असून जर कुर्ला परिसर पाण्याखाली गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ सईदा खान यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला. त्यामुळे मिठी नदीच्या सफाईबाबत प्रशासनाच्यावतीने पुढील कार्यवाही कोणत्या प्रकारे होणार आहे, कंत्राटदार येत नसतील तर काय केले जाणार याची माहिती घेवून पुढील स्थायी समितीच्या सभेपुढे निवेदन करावे अशाप्रकारचे निर्देश स्थायी समिती अध्यक्षांनी प्रशासनाला दिले आहे.


मुंबई महापालिकेच्या छोट्या आणि मोठ्या नाल्यांच्या दोन वर्षांच्या सफाईसाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. त्यात मिठी नदीच्या सफाईसाठी नेमलेल्या कंत्राटदारांवर कारवाई झाल्याने त्यांना बद करण्यात आले. त्यामुळे मिठी नदीच्या कामांसाठी नव्याने निविदा मागवण्यात येत आहे. परंतु १७ मार्च ही शेवटची तारीख असूनही एकही कंत्राटदार मिठी नदीच्या सफाई कामासाठी पुढे आलेला नाही. काँग्रेसचे महापालिका गटनेते अश्रफ आझमी यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे ही बाब स्थायी समितीच्या निदर्शनास आणून देत जर मिठी नदीची स्वच्छता झाली नाही तर मुंबईला बुडण्यापासून कसे वाचवणार असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे कुर्ला भागाला डुबण्यासाठी कोणीही वाचवू शकणार नाही अशी भीती व्यक्त केली.


या हरकतीच्या मुद्दयाला शिवसेनेच्या नगरसेविका अंजली नाईक यांनी पाठिंबा देत एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील मोठ्या नाल्यांसाठी एकही कंत्राटदार पुढे आला नसल्याचे सांगत प्रशासनाने याबाबत भूमिका स्पष्ट करायला हवी. तर शिवसेना महापालिका गटनेते अमेय घोले यांनी मिठी नदीची सफाई न झाल्यास अर्धी मुंबई पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली. तर काँग्रेसच्या मिरांडा यांनी यापूर्वी नगरसेवक नसल्यामुळे कंत्राटदारांचे चांगलेच फावले होते, पण आता नगरसेवक आल्यामुळे त्यांना गाळातील हातसफाई करता येणार नसल्यामुळे ते घाबरले असून त्यामुळेच त्यांनी निविदेत भाग घेतला नसल्याचे सांगितले.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या डॉ सईदा खान यांनी मिठी नदी ही नाला नाही तर नदी आहे हे २ ६ जुलैच्या महापुराने मुंबईकरांना दाखवून दिले. मिठी नदीला जोडणारे ११ ऑऊटफॉल असून त्यांची सफाईही योग्यप्रकारे झालेली नाही. त्यामुळे ही सफाई कधी होणार असा सवाल करत त्यांनी जर कुर्ला परिसर पाण्याखाली गेल्यास मी उपोषणाला बसेन असा इशारा दिला. तर एमआयएमआयएचे सलीम कुरेशी यांनी मिठी नदीमुळे कुर्लाच नाहीतर एम पूर्व भागही पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली. भाजपचे प्रकाश दरेकर यांनी यापूर्वी भाजपचे नगरसेवक पहारेकरी होते आणि आता आम्ही सेवेकरी असून नाल्यातील गाळ तळापासून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे सांगितले. तर मिनाक्षी पाटणकर यांनी विभागातील नाले अरुंद असल्यामुळे लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरत असल्याचे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत हरिष भांदिर्गे, यशोधर फणसे, शिवकुमार झा, दिपमाला बढे तसेच श्रध्दा जाधव आदींनी चर्चेत भाग घेतला होता.


यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी नालेसफाईचा हा मुद्दा गंभीर असून मिठीनदीच्या निविदेबाबत प्रशासनाने स्वत:हून निवेदन करायला हवे होते. नालेसफाईच्या मुद्दयाबाबत महापौरांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न झाली आहे. त्यानुसार आम्ही प्रशासनाला सूचना केल्याच आहेत. पण या मुद्दयाच्या अनुषंगाने पुढील स्थायी समितीच्या बैठकी प्रशासनाने सविस्तर निवेदन करून माहिती द्यावी असे निर्देश दिले. मुंबईत पुरसदृश्य स्थिती होणार नाही याची काळजी घ्यावी अशाही सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.

Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर