खेळाडूंची ‘A+’ श्रेणीच रद्द? BCCIचा मोठा निर्णय; बुमराह- जडेजाच्या मानधनात होणार घट

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय २०२५-२६ हंगामासाठी क्रिकेटपटूंच्या वार्षिक करार आणि मानधन रचनेत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, बीसीसीआयकडून ‘A+’ ही सर्वोच्च श्रेणीच रद्द करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


२०२४-२५ हंगामात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या चार खेळाडूंचा ‘A+’ श्रेणीत समावेश होता. या श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक ७ कोटी रुपये मानधन दिले जात होते.


या ‘A+’ श्रेणीसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्याने खेळणे आणि किमान एका फॉरमॅटमध्ये अव्वल १० मध्ये स्थान मिळवणे आवश्यक होते. मात्र, रोहित शर्मा आणि विराट कोहली आता मर्यादित फॉरमॅटमध्येच खेळत आहेत, तर रवींद्र जडेजाने देखील टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे या निकषांनुसार आता जसप्रीत बुमराह हा एकमेव पात्र खेळाडू उरला होता. यामुळेच BCCIने ‘A+’ ही श्रेणीच पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.


या निर्णयामुळे बुमराह आणि जडेजा यांना ‘A+’ वरून ‘A’ श्रेणीत घसरवण्यात आले असून, आता त्यांना ७ कोटींऐवजी ५ कोटी रुपये मानधन मिळणार आहे. मात्र, बुमराहच्या सातत्यपूर्ण कामगिरीचा विचार करून BCCI त्याचे मानधन अचानक कमी होऊ नये, यासाठी पर्याय शोधत असल्याचे सांगितले जात आहे.


याशिवाय, इतर काही खेळाडूंच्या करारमूल्यातही बदल होण्याची शक्यता आहे. भारताचा टी-२० उपकर्णधार अक्षर पटेल याच्या मानधनात वाढ होऊ शकते. तो व्हाईट-बॉल संघाचा महत्त्वाचा भाग असूनही सध्या ‘C’ श्रेणीत आहे, जिथे त्याला १ कोटी रुपये मिळतात.


एकूणच, कामगिरीनुसार न्याय्य मानधन देण्याच्या उद्देशाने BCCI करार व्यवस्थेत मोठे बदल करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून