अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे अमरावती, नागपूरमधील पेपर फुटीचे प्रकरण चर्चेत असतानाच सांगोल्यामध्ये प्रश्नपत्रिका चोरल्याची घटना घडली होती. सांगोला विद्यामंदिर येथील स्ट्रॉंग रूमचे कुलूप तोडून ५० प्रश्नपत्रिका पळवल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी आता सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली असून विद्यार्थ्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली आहे.



विद्यार्थ्यानेच प्रश्नपत्रिका पळवली



याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगोला येथून दहावी बोर्डाची भूगोलाची प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याची घटना घडली. यानंतर या संपूर्ण प्रकाराची पोलिसांनी सखोल चौकशी करत तपास केला. यामध्ये भूगोलाचा पेपर झाल्यानंतर एका इलेक्ट्रिक बाइकवरून आलेल्या दहावीत शिकणाऱ्याच मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यानंतर या मुलाने आपणच पेपर चोरला असल्याची कबुली दिली आहे.


महत्त्वाचे म्हणजे सगळे पेपर सोपे गेले भूगोलाचा अभ्यास झाला नाही. म्हणून चोरीची घटना घडली असल्याचा अनुमान सांगोल्यात लावला जात आहे. या चोरी प्रकरणात अल्पवयीन मुलाने वापरलेली इलेक्ट्रिक दुचाकी तसेच चोरलेली प्रश्नपत्रिका पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या धक्कादायक प्रकाराने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून शिक्षण व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसत आहे.

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने