भोंदू बाबा अशोक खरातशी संबंधित नेत्यांवर कारवाई करणार, प्रफुल्ल पटेलांनी दिली माहिती

मुंबई : भोंदू बाबा अशोक खरातप्रकरणी राज्यातील विविध नेत्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी भूमिका स्पष्ट केली असून, याप्रकरणात ज्यांची नावे आहेत, त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.


माध्यमांशी संवाद साधताना पटेल म्हणाले, “याप्रकरणी चौकशी केली जाईल. चौकशीदरम्यान ज्या कोणाची नावे समोर येतील, त्यांच्यावर तातडीने आणि सक्तीने कारवाई केली जाईल. काही राजकीय नेत्यांची नावे त्यांच्याशी (भोंदू बाबा अशोक खरात) जोडली गेली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून कारवाई केली जाईल. ही कारवाई पुढील दोन-तीन दिवसांत दिसेल”, असेही त्यांनी स्पष्ट केले.


नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन याच्या पेन ड्राईव्हमध्ये सापडलेल्या ५८ व्हिडिओमुळे खबळबळ उडाली आहे. बलात्काराच्या आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली असून, २४ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. ज्योतिष, अंकशास्त्र, तंत्रमंत्राच्या आडून त्याने महिलांचे शोषण केल्याचा आरोप आहे. दरम्यान, सिन्नर तालुक्यातील त्याच्या मंदिर ट्रस्टवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर संचालक आहेत. चाकणकर या अशोक खरातसाठी छत्री पकडून उभ्या असल्याचे फोटो सुरुवातीला समोर आले. त्यानंतर अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण