Iran-US-Israel War : इराणने अमेरिकेच्या F-35 लढाऊ विमानाला केले लक्ष्य

- इस्रायली तेल शुद्धीकरण कारखान्यावर मोठा हल्ला


पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशन गार्ड्स कॉर्प्स (आयआरजीसी) ने गुरुवारी पहाटे २:५० वाजता मध्य इराणच्या हवाई क्षेत्रात अमेरिकेच्या एफ-३५ स्टेल्थ लढाऊ विमानाला लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. आयआरजीसीच्या म्हणण्यानुसार, या विमानाच्या कोसळण्याची शक्यता अत्यंत जास्त आहे. दुसरीकडे, वृत्तानुसार अमेरिकन संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर एका एफ-३५ विमानाला आपत्कालीन लँडिंग करावी लागली.


अमेरिकन सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी पुष्टी केली की एफ-३५विमान इराणच्या वर सुरू असलेल्या एका मोहिमेवर होते. त्यांनी सांगितले की विमान सुरक्षितपणे उतरले असून वैमानिकाची प्रकृती स्थिर आहे. सध्या या घटनेची चौकशी सुरू आहे.


एफ-३५ हे जगातील सर्वात महागड्या लढाऊ विमानांपैकी एक असून त्याची किंमत १०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक आहे. जर इराणचा दावा पूर्णपणे खरा ठरला, तर या युद्धातील ही सर्वात मोठी लष्करी कामगिरी मानली जाईल. इराणने असेही दावा केला आहे की या घटनेपूर्वी त्यांनी अमेरिका आणि इस्रायलचे १२५ हून अधिक ड्रोन पाडले आहेत.


या युद्धादरम्यान अमेरिकन सैन्याला आणखी काही नुकसान सहन करावे लागले आहे. अहवालानुसार, कुवैतच्या हवाई संरक्षण प्रणालीने चुकून अमेरिकेची तीन एफ-१५ ईगल लढाऊ विमाने पाडली. मात्र, या तिन्ही विमानांतील सहाही क्रू सदस्य सुरक्षित बचावले. याशिवाय, मागील आठवड्यात इराकमध्ये अमेरिकेचे केसी-१३५ स्ट्रॅटोटँकर विमान कोसळले होते. या दुर्घटनेत विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला. अमेरिकन सैन्याने स्पष्ट केले की हा अपघात शत्रूच्या हल्ल्यामुळे झाला नव्हता.


या सर्व घटनांनंतरही अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी अमेरिका निर्णायकरीत्या युद्ध जिंकत असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, इराणची हवाई संरक्षण व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.दरम्यान, अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रदेशातील आपली पकड मजबूत करण्यासाठी अमेरिकेने ओकिनावा येथून मरीन एक्सपेडिशनरी युनिट आणि त्रिपोली अॅम्फिबियस रेडी ग्रुप तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे युद्धनौके यूएसएस त्रिपोली अलीकडेच सिंगापूरजवळ दिसून आले होते.

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.