पाकिस्तानातही धुरंधरची क्रेझ,बंदी असूनही टीव्हीवर झळकतोय धुरंधर २

जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा रणवीर सिंहचा 'धुरंधर २' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या रणवीरच्या या सिनेमानं पहिल्याच दिवशी १०० कोटींहून अधिक कमाई करून ऐतिहासिक विक्रम रचला आहे.


रणवीर सिंहच्या धुंरधर द रिव्हेंज सिनेमाचं भारतात कौतुक होतच आहे. मात्र, आता पाकिस्तानमध्येही या सिनेमाची क्रेझ पाहायला दिसून येत आहे.


सध्या पाकिस्तानात भारतीय सिनेमांच्या प्रदर्शनावर अधिकृतपणे बंदी आहे. विशेषतः 'धुरंधर २' हा सिनेमा पाकिस्तानातील दहशतवादावर आधारित असल्यानं हा सिनेमा पाकिस्तानात रिलीज झालेला नाही. पण, असं असतानाही पाकिस्तानातील प्रेक्षक हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.


या सिनेमाला अधिकृतपणे बंदी असतानाही पाकिस्तानमधील लोक या सिनेमाचं 'पायरेटेड व्हर्जन' डाऊनलोड करून धुरंधर २ सिनेमा पाहत असल्याचं ट्विट एका पाकिस्तानी पत्रकारानं केलं आहे.


सध्या ट्विटरवर एका पाकिस्तानी पत्रकाराचे ट्विट व्हायरल झालं असून यामध्ये हा पत्रकार लाहोरमधील आपल्या घरी बसून टीव्ही स्क्रीनवर 'धुरंधर २' चा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. तसेच, या ट्विटमध्ये पत्रकारनं म्हटलं आहे की, "हे अत्यंत दुर्दैवी आहे की सिनेमाच्या प्रदर्शनाच्या दिवशीच त्याचं पायरेटेड व्हर्जन पाकिस्तानमध्ये पोहोचलं असून पाकिस्तानी लोक भारतीय सिनेमाशिवाय राहू शकत नाहीत, मग तो सिनेमा पाकिस्तानशी संबंधित दहशतवादावर आधारित असला तरीही ही तो सिनेमा ते बघतीलच.''



त्यामुळे आता 'धुरंधर'नंतर धुरंधर द रिव्हेंज पाहण्यासाठी जगभरातील प्रेक्षक उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' या सिनेमानं भारतात पहिल्याच दिवशी १०२.५५ कोटी रुपयांची जबरदस्त ओपनिंग केली असून रणवीर सिंहच्या या सिनेमानं पाकिस्तानमधील प्रेक्षकांनाही भूरळ पाडली आहे.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’