समुद्री मार्ग खुले ठेवा, व्यापारात अडथळे नकोत; मोदींचे इराणच्या राष्ट्राध्यक्षांना शांततेचे आवाहन

नवी दिल्ली : पश्चिम आशियामध्ये इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना, भारताने या वादात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोठे राजनैतिक पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी शनिवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मसूद पेजेश्कियन यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली. गेल्या आठ दिवसांतील या दोन्ही नेत्यांमधील ही दुसरी चर्चा असून, भारताने या प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेसाठी पुन्हा एकदा आग्रही भूमिका मांडली आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियन यांना ईद-उल-फितर आणि इराणचे नवीन वर्ष नवरोज निमित्त शुभेच्छा दिल्या. ‘हा सण पश्चिम आशियात शांतता, स्थिरता आणि समृद्धी घेऊन येईल,’ अशी आशा पंतप्रधान मोदींनी यावेळी व्यक्त केली. या शुभेच्छांसोबत पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियात बिघडत चाललेल्या सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र चिंता व्यक्त केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संवादादरम्यान पश्चिम आशियातील बिघडत चाललेल्या परिस्थितीवर भारताची भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली. त्यांनी प्रामुख्याने प्रादेशिक सुरक्षा, जागतिक व्यापार आणि मानवी हित या तीन गोष्टींवर भर दिला.
पंतप्रधानांनी पश्चिम आशियातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर होणाऱ्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. अशा हल्ल्यांमुळे केवळ प्रादेशिक स्थिरता धोक्यात येत नाही, तर जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होऊन जगाच्या अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होतो, असे त्यांनी नमूद केले. तसेच होर्मुझची सामुद्रधुनी हा समुद्री मार्ग सुरक्षित राहणे अनिवार्य असल्याचे मोदींनी सांगितले. युद्धामुळे होणारी निष्पाप नागरिकांची जीवितहानी आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल पंतप्रधानांनी खोलवर दुःख व्यक्त केले. या कठीण काळात इराणमधील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि त्यांचे हित ही भारताची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.


भारताची जागतिक नेत्यांशी चर्चा


पश्चिम आशियातील संकट ओळखून पंतप्रधान मोदी सातत्याने जागतिक नेत्यांच्या संपर्कात आहेत. शुक्रवारी त्यांनी बहरीनचे राजे हमद बिन ईसा अल खलिफा यांच्याशी चर्चा केली होती. यापूर्वी त्यांनी कतारचे अमीर, जॉर्डनचे राजे आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशीही संवाद साधला आहे. "कोणताही वाद हा केवळ संवाद आणि मुत्सद्देगिरीनेच सुटू शकतो," हे भारताचे अधिकृत धोरण असल्याचे सांगितले जात आहे.


वाढता तणाव आणि भारताची भूमिका


एकीकडे अमेरिका आणि इस्रायल इराणमधील सत्तापालटासाठी आक्रमक पवित्रा घेत आहेत, तर दुसरीकडे इराणचे नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी शत्रूंसमोर न झुकण्याची शपथ घेतली आहे. अशा कठीण काळात भारत मध्यस्थाची भूमिका बजावत आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Nashik Kumbhmela : नाशिक-त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार ! सिंहस्थ कुंभमेळ्यावर तब्बल ३५ हजार कोटींचा खर्च

Nashik Kumbhmela : हिंदू धर्मीयांच्या आस्थेशी जोडलेल्या कुंभमेळ्याने गतवर्षी प्रयागराजमध्ये गर्दीचे नवे विक्रम

PM Selfie Video : भारताचा विकास दर ७.८%; पंतप्रधान मोदींकडून नागरिकांचे अभिनंदन, म्हणाले- ‘ही आपल्या सामूहिक शक्तीची ओळख’

नवी दिल्ली : भारताने आर्थिक विकासाच्या बाबतीत दमदार कामगिरी करत आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच