धुरंधरमधील 'या' अभिनेत्यानं १० वर्षांपूर्वीच रणवीरसोबत बनवली होती रील

अभिनेता रणवीर सिंहच्या धुरंधरचा पहिला भाग १५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज झाला होता. यामध्ये रणवीर सिंहसोबत अनेक टेलिव्हिजन अभिनेते झळकले होते. यापैकीच एक अभिनेता म्हणजे गौरव गेरा हे पाकिस्तानातील ज्यूस सेंटरच्या मालकाच्या भूमिकेत झळकले आहेत. मात्र, अभिनेता गौरव गेरा यांनी धुरंधर सिनेमात झळकण्याआधी टेलिव्हिजनवर 'जस्सी जैसी कोई नही' आणि 'चुटकी शॉपकीपर' यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. पण, यानंतर त्यांनी धुरंधरमध्ये साकारलेल्या 'मोहम्मद आलम' या भूमिकेत त्यांच्या चाहत्यांनी त्यांना चक्क ओळखलं नसल्याचा खुलासा गौरव गेरा यांनी एका मुलाखतीत बोलताना केला आहे.


तसेच यावेळी गौरव गेरा यांनी सांगितलं की अभिनेता रणवीर सिंहसोबत त्यांनी १० वर्षांपूर्वी एक रील बनवली होती. जेव्हा ते चुटकी शॉपकिपर शो करत असताना त्यावेळी रणवीर सिंह बाजीराव मस्तानी सिनेमाला प्रमोट करण्यासाठी आले होते. त्यावेळी, त्यांनी एकत्र रील बनवली असून त्यांनी तेव्हा ही रील पोस्टही केली होती.





तसेच, यावेळी अभिनेता गौरव गेरा यांनी सांगितलं की धुरंधर सिनेमात अभिनेता रणवीर सिंहसोबत काम करताना त्यांना फार मज्जा आली आणि धुरंधरच्या सेटवर रणवीर आणि त्यांच्यासोबत फार छान वागत असून त्यांना रणवीरचा स्वभाव अंत्यत आवडला असल्याचं गौरव गेरा यांनी सांगितलं आहे.

Comments
Add Comment

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी