ब्रिटनची ‘एचएमएस अन्सन’ अणु-पाणबुडी अरबी समुद्रात तैनात

लंडन : मध्य पूर्वेकडे सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षाच्या तिसऱ्या आठवड्यात ब्रिटनने ब्रिटिश रॉयल नेव्हीची अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी एचएमएस एन्सन अरब सागरात तैनात करण्यात आली आहे. ही पाणबुडी टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे.


लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार, अणुऊर्जेवर चालणारी एचएमएस एन्सन या महिन्याच्या सुरुवातीला पर्थ येथून रवाना झाली होती आणि सुमारे ५,५०० मैलांचा प्रवास करून या भागात पोहोचली आहे. एचएमएस एन्सन ही ब्रिटनच्या एस्ट्यूट-क्लासमधील पाचवी पाणबुडी असून आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या, अत्याधुनिक आणि शक्तिशाली आक्रमक पाणबुड्यांपैकी एक मानली जाते.ही पाणबुडी टॉमहॉक ब्लॉक-IV क्रूझ क्षेपणास्त्रे आणि स्पीअरफिश हेवीवेट टॉरपीडो यांनी सुसज्ज आहे. या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता सुमारे १,६०० किलोमीटर असून त्यामुळे इराणमधील कोणतेही लक्ष्य गाठणे शक्य आहे.


ही पाणबुडी मागील महिन्यात ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे पोहोचली होती, जिथे ती ऑस्ट्रेलिया-यूके-अमेरिका सुरक्षा भागीदारी अंतर्गत तैनात करण्यात आली होती. मार्चच्या सुरुवातीला ती पर्थहून रवाना झाली आणि सुमारे ५,५०० मैलांचा प्रवास करून अरब सागराच्या उत्तरेकडील खोल पाण्यात पोहोचली आहे. ही तैनाती अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा इराणने होर्मुज सामुद्रधुनी बहुतांश जहाजवाहतुकीसाठी प्रभावीपणे बंद केली आहे. इराणी जहाजांवरील हल्ले आणि सामुद्रधुनी बंद करण्याच्या कारवाईचा ब्रिटनसह २२ देशांनी संयुक्तपणे निषेध केला आहे.


दरम्यान, ब्रिटिश सरकारने अमेरिकेला इराणी ठिकाणांवरील हल्ल्यांसाठी ब्रिटिश तळांचा वापर करण्याची परवानगी देखील दिली आहे. अहवालांनुसार, ही पाणबुडी दर २४ तासांनी पृष्ठभागावर येऊन लंडनमधील परमनंट जॉइंट हेडक्वार्टर्स (पीजेएचक्यू) यांच्याशी संपर्क साधते. कोणताही हल्ला करण्याचा अंतिम आदेश पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या मंजुरीनंतरच दिला जाणार आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे