'होर्मुझची सामुद्रधुनी शत्रू देशांसाठी बंद'

तेहरान : होर्मुझची सामुद्रधुनी शत्रू देशांसाठी बंद ठेवणार, असा इशारा संयुक्त राष्ट्रांतर्गत असलेल्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेतील इराणचे प्रतिनिधी अली मौसावी यांनी दिला. जे युद्धात शत्रू अथवा शत्रूचे सहकारी म्हणून सहभागी झालेले नाहीत त्यांच्या जहाजांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली आहे. फक्त इराण सरकारशी समन्वय साधून आणि नियमांचे पालन करत संबंधित देशांच्या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करता येईल, असे अली मौसावी म्हणाले. अली मौसावी यांचे हे वक्तव्य म्हणजे अमेरिका आणि इस्रायल तसेच युद्धात त्यांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या साथ देणारे देश यांना दिलेला इशारा आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.


चीनच्या शिन्हुआ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अली मौसावी यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबतची इराणची भूमिका जाहीर केली. याआधी होर्मुझची सामुद्रधुनी ४८ तासांत खुली केली नाही तर इराणला परिणाम भोगावा लागेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी दिला. या इशाऱ्याला इराणने थेट प्रत्युत्तर दिले आहे.


अली मौसावी हे सध्या संयुक्त राष्ट्रांतर्गत असलेल्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेतील इराणचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. ते आधी इंग्लंडमध्ये इराणचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. त्यांनी इराण सरकार होर्मुझच्या सामुद्रधुनीत सार्वभौमत्वाच्या तसेच देशहिताच्या रक्षणसाठी आवश्यक ते उपाय करणार असल्याचे जाहीर केले. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इराणच्या परवानगीने प्रवास करत असलेल्या जहाजांच्या रक्षणासाठी इराण सरकार आवश्यक ते सर्व उपाय करत असल्याचेही अली मौसावी म्हणाले.


जगाच्या एकूण तेल व्यापारापैकी २० टक्के व्यापार होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या मार्गाने होतो. यामुळे इराणच्या इशाऱ्यानंतर जागतिक पातळीवर तणाव वाढण्याची आणि युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता वाढली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीची कोंडी केली तर इराणला वीज पुरवठा करणारी यंत्रणा निकामी करण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. या पार्श्वभूमीवर इराणने थेट अमेरिका आणि इस्रायल यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.


अमेरिका आणि इस्रायल यांनी २८ फेब्रुवारी २०२६ पासून इराण विरोधात हवाई हल्ले सुरू केले आहेत. आज २२ मार्च २०२६ म्हणजेच युद्धाचा २३ वा दिवस आहे. अद्याप पश्चिम आशियात सुरू असलेले युद्ध थांबलेले नाही. इराणने दिलेल्या इशाऱ्यामुळे तर अमेरिका आणि इस्रायलच्याच चिंतेत वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Crime News : अमेरिकेत केरळच्या महिलांची हत्या

कॅलिफोर्निया : अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये भारतातील केरळच्या दोन महिलांची हत्या करण्यात आली आहे. या

Nepal Flood : नेपाळच्या महापुरात ९०३ जणांचा मृत्यू, ४२४७ बेपत्ता; मदतकार्य सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि मदतकार्य सातत्याने सुरू आहे.

Nepal Flood Rescue : नेपाळमध्ये महापुराचा कहर; अनोळखी व्यक्तीची एक हाक ठरली जीवनदायी, ३७० विद्यार्थी-शिक्षक बचावले

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरादरम्यान एका अनोळखी व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे तब्बल ३७० हून अधिक विद्यार्थी

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Nepal Floods : मृतांचा आकडा ९०३ वर तर ४,२४७ बेपत्ता; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

काठमांडू : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात आलेल्या विनाशकारी पुरानंतर मदत, शोध आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.