ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन

नागपूर : विदर्भातील ज्येष्ठ राजकारणी, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक तथा राज्याचे माजी मंत्री दत्ता मेघे यांचे रविवारी नागपूर येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने विदर्भासह राज्याच्या राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली. मेघे यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३६ रोजी वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे झाला होता. त्यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपमध्ये काम करत चार वेळा लोकसभा खासदार म्हणून नागपूर, रामटेक व वर्धा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय राज्यसभा सदस्य तसेच महाराष्ट्र विधानपरिषदेतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. राजकारणासोबतच त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. ‘नागर युवक शिक्षण संस्था’च्या माध्यमातून तसेच ‘दत्ता मेघे इन्स्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्स’सारख्या संस्थांच्या उभारणीतून त्यांनी ग्रामीण भागात शिक्षण व आरोग्य सुविधा पोहोचवल्या. त्यांच्या कार्यामुळे विदर्भातील हजारो विद्यार्थ्यांना संधी मिळाली. मेघे हे विदर्भ राज्याच्या मागणीचे समर्थक म्हणूनही ओळखले जात होते. त्यांच्या कुटुंबातील पुढील पिढीही राजकारणात सक्रिय असून पुत्र समीर मेघे आमदार आहेत.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण