हॉकी इंडियाची ८ व्या वार्षिक पुरस्कार २०२५ साठी नामांकने जाहीर

नवी दिल्ली : हॉकी इंडियाने ८ व्या वार्षिक पुरस्कार २०२५ साठी नामांकनांची यादी जाहीर केली. २७ मार्च २०२६ रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात, २०२५ या वर्षात भारतीय हॉकीसाठी उत्कृष्ट कामगिरी आणि योगदान देणाऱ्या हॉकूपटू आणि अधिकाऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे.


या सोहळ्यातील प्रमुख पुरस्कारांमध्ये 'हॉकी इंडिया बलबीर सिंग सीनियर प्लेयर ऑफ द इयर' पुरस्काराचा समावेश आहे. जो पुरुष आणि महिला गटातील सर्वोत्कृष्ट हॉकपटूंना दिला जाणार आहे. तसेच, उदयोन्मुख प्रतिभावंतांना 'हॉकी इंडिया जुगराज सिंग इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर (पुरुष अंडर-२१)' आणि 'हॉकी इंडिया असुंता लाक्रा इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर (महिला अंडर-२१)' या पुरस्कारांनी सन्मानित केले जाणार आहे.


विविध स्थानांवरील उत्कृष्ट कामगिरीसाठी 'हॉकी इंडिया बलजीत सिंग गोलकीपर ऑफ द इयर', 'हॉकी इंडिया परगत सिंग बेस्ट डिफेंडर ऑफ द इयर', 'हॉकी इंडिया अजित पाल सिंग बेस्ट मिडफिल्डर ऑफ द इयर' आणि 'हॉकी इंडिया धनराज पिल्लई बेस्ट फॉरवर्ड ऑफ द इयर' हे पुरस्कारही प्रदान केले जातील. या आठ श्रेणींमध्ये एकूण ३२ हॉकीपटूंची निवड करण्यात आली आहे.


याव्यतिरिक्त, 'हॉकी इंडिया प्रेसिडेंट्स आउटस्टँडिंग अचिव्हमेंट अवॉर्ड', 'जमन लाल शर्मा इनव्हॅल्युएबल कॉन्ट्रिब्युशन अवॉर्ड', पंच आणि तांत्रिक अधिकाऱ्यांसाठी विशेष सन्मान आणि 'बेस्ट मेंबर युनिट अवॉर्ड' हे पुरस्कारही या सोहळ्यात प्रदान केले जातील.


राजगीर (बिहार) येथे २०२५ च्या आशिया कपमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या भारतीय पुरुष संघाला आणि तामिळनाडू येथे झालेल्या एफआयएच हॉकी मेन्स ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये कांस्यपदक जिंकलेल्या भारतीय ज्युनियर पुरुष संघालाही सन्मानित केले जाणार आहे. १५ व्या हॉकी इंडिया राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्य संघांनाही सन्मानित केले जाईल.


हॉकी इंडियाचे अध्यक्ष डॉ. दिलीप तिर्की म्हणाले, "भारतीय हॉकीसाठी हे वर्ष महत्त्वपूर्ण आहे आणि मागील वर्षातील उत्कृष्ट कामगिरीला मान्यता देणे महत्त्वाचे आहे. हे पुरस्कार हॉकपटू आणि अधिकाऱ्यांच्या समर्पणाचा आणि कामगिरीचा सन्मान करतात."


महासचिव भोला नाथ सिंग म्हणाले, "हे पुरस्कार खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी आणि सदस्य संघांच्या सामूहिक प्रयत्नांना मान्यता देतात, ज्यांनी भारतीय हॉकीला मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे."



नामांकन मिळाले हॉकपटू खालीलप्रमाणे:


वर्षातील सर्वोत्कृष्ट गोलकीपर (बलजीत सिंग पुरस्कार): प्रिन्स दीप सिंग, कृष्ण बहादूर पाठक, बिचू देवी खरिबाम, सूरज करकेरा


वर्षातील सर्वोत्कृष्ट बचावपटू (परगत सिंग पुरस्कार): संजय, अमित रोहिदास, जुगराज सिंग, हरमनप्रीत सिंग.


वर्षातील सर्वोत्कृष्ट मिडफिल्डर (अजित पाल सिंग पुरस्कार): हार्दिक सिंग, सुमित, राजकुमार पाल, नीलकांत शर्मा.


वर्षातील सर्वोत्कृष्ट फॉरवर्ड (धनराज पिल्लई पुरस्कार): सुखजीत सिंग, अभिषेक, नवनीत कौर, शिलानंद लाक्रा.


वर्षातील उदयोन्मुख हॉकीपटू (२१ वर्षाखालील महिला, असुंता लाक्रा पुरस्कार): साक्षी राणा, ज्योती सिंग, सुनीलिता टोप्पो, कनिका सिवाच


वर्षातील उदयोन्मुख हॉकीपटू (पुरुष अंडर-२१ , जुगराज सिंग पुरस्कार): प्रिन्स दीप सिंग, मनमीत सिंग, अनमोल एक्का, अर्शदीप सिंग.


वर्षातील सर्वोत्तम महिला हॉकपटू (बलबीर सिंग वरिष्ठ पुरस्कार): नवनीत कौर, सलीमा टेटे, लालरेमसियामी, सविता.


वर्षातील सर्वोत्तम पुरुष हॉकीपटू (बलबीर सिंग वरिष्ठ पुरस्कार): हार्दिक सिंग, सुखजीत सिंग, संजय, अभिषेक

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून