होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर इराणकडून २० लाख डॉलर्स शुल्क

तेहरान : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेले संकट अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. आता इराणने जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुज जलडमरूमधून जाणाऱ्या जहाजांवर निश्चित शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया अहवालांनुसार हे शुल्क २० लाख डॉलर्स (सुमारे १८ कोटी रुपये) इतके असेल. इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणी संसदेतल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सदस्य अलाएद्दीन बोरोजेर्दी यांनी ही माहिती दिली असून हे शुल्क लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


अलाएद्दीन बोरोजेर्दी यांनी सांगितले की, होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजांवर शुल्क लावण्याचा निर्णय हा नव्या सार्वभौम व्यवस्थेच्या स्थापनेचे प्रतीक आहे. ते म्हणाले, “जलडमरूमधून प्रवास करणाऱ्या काही जहाजांकडून वाहतूक शुल्क म्हणून २० लाख डॉलर्स वसूल करणे हे इराणच्या सामर्थ्याचे प्रदर्शन आहे.” पुढे ते म्हणाले, “युद्धाची एक किंमत असते, त्यामुळे स्वाभाविकपणे आम्हाला असे पाऊल उचलावे लागेल.”


बोरोजेर्दी यांची ही प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर समोर आली आहे. ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांच्या आत होर्मुज जलडमरूमध्य पूर्णपणे खुला करण्यास सांगितले होते. त्यांनी इशारा दिला की, इराणने तसे केले नाही तर अमेरिकेकडून इराणमधील वीज प्रकल्पांवर हल्ला केला जाईल.दरम्यान, इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी अलीकडील एका वक्तव्यात म्हटले होते की, होर्मुजचा मार्ग इराणच्या शत्रूंना वगळता इतर सर्व देशांसाठी खुला आहे. मात्र या विधानानंतर आता इराणी खासदारांकडूनच होर्मुजमार्गे जाणाऱ्या जहाजांवर मोठे शुल्क लावण्याची भूमिका मांडली जात आहे.


होर्मुज जलडमरूमध्य हा जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक मानला जातो. या मार्गातून जगातील सुमारे २० टक्के तेल आणि गॅस पुरवठा होतो. हा मार्ग बंद झाल्यास जागतिक बाजारात तेल आणि गॅसच्या किंमती झपाट्याने वाढू शकतात. अलीकडील हल्ले आणि वाढत्या तणावामुळे ऊर्जा बाजारात आधीच मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. इराणच्या सागरी सीमेजवळ असलेला होर्मुज हा अतिशय अरुंद समुद्री मार्ग असून जागतिक तेल निर्यातीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावर इराणला रणनीतिक आघाडी असून आवश्यक असल्यास तो पुरवठा अडवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.