Iran-US-Israel War : इराणचा इस्रायलवर मोठा मिसाइल हल्ला; ३०० हून अधिक जखमी

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज २४वा दिवस आहे. अशातच इराणने रविवारी सकाळी इस्रायलवर मोठा हल्ला करत ४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली.


अहवालानुसार, या हल्ल्यात ३०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयानेही हल्ल्याची पुष्टी करत जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगितले आहे.


इराणकडून इस्रायलवर सातत्याने हल्ले सुरू आहेत. आज सकाळच्या हल्ल्यापूर्वी शनिवारी रात्री इराणने इस्रायलमधील डिमोना आणि अराद या शहरांवरही हल्ला केला होता. डिमोना येथे इस्रायलचा महत्त्वाचा अणुऊर्जा प्रकल्प आहे. दरम्यान, इस्रायल आणि अमेरिका संयुक्तपणे इराणवर हल्ले करत आहेत, तर इराणही त्याला प्रत्युत्तर देत आहे.


इराणकडून वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, जर इराणने पुढील ४८ तासांत होर्मुज सामुद्रधुनी खुली केली नाही, तर अमेरिका इराणमधील वीज प्रकल्पांवर हल्ला करेल. अमेरिकेने असेही स्पष्ट केले आहे की सामुद्रधुनी खुली न झाल्यास सर्वात मोठ्या ऊर्जा प्रकल्पावर हल्ला करून कारवाईची सुरुवात केली जाईल.


ट्रम्प यांच्या या अल्टिमेटमला प्रत्युत्तर देताना इराणने इशारा दिला आहे की, त्यांच्या वीज प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आले तर मध्यपूर्वेत अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित सर्व ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले केले जातील.

Comments
Add Comment

WhatsApp : परदेशात गेल्यावर सिम कार्डची कटकट कायमची बंद होणार? व्हॉट्सॲप आणतंय 'हे' धमाकेदार फीचर!

परदेश प्रवास करणार्‍यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. जगभरात मेसेजिंगसाठी सर्वाधिक वापरल्या

Germany Strange Rules: बागेत बाकावर बसून रडणाऱ्या महिलेला दंड! जर्मनीतील अजब नियम चर्चेत

Germany Strange Rules: कधीकधी, आपण एकटे असतो, अस्वस्थ वाटत असते, तेव्हा कोणाशीतरी बोलण्याऐवजी थोडा वेळ एकटे बसावेसे वाटते.

16 डिसेंबरपूर्वी बांगलादेशात महाभूकंप! हसीनांच्या निकटवर्तीयांना अटक; 108 तुकड्या तैनात झाल्याने खळबळ

ढाका : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काहीच काळ शिल्लक असताना, तारिक

इंडोनेशियात बेकायदा सोन्याच्या खाणीत पाणी शिरलं; 13 कामगारांचा मृत्यू, 13 बेपत्ता

इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात एका अनधिकृत सोन्याच्या खाणीत पाणी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या

पोलिश तरुणी वंदे भारत पाहून थक्क! चहा-पोह्याचा आस्वाद घेत रचला व्हायरल व्हिडिओ; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव!

भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचा आणि बदलत्या स्वरूपाचा अनुभव आता परदेशी पर्यटकांनाही भुरळ घालत आहे. पोलंडमधील एका

Senator speech holding 6 month baby parliament : ६ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन सिनेटरचे संसदेत भाषण; लिडिया थॉर्पसोबत चिमुकलीचा लपाछपीचा खेळ, भावूक व्हिडिओ व्हायरल

मुंबई : राजकीय सभागृहाचे कामकाज म्हटले की तणावपूर्ण चर्चा, खडाजंगी आणि कडक शिस्त असेच चित्र नेहमी पाहायला मिळते.