Kalyan: नागरिकांच्या घरांवर फेकले सुतळी बॉम्ब; कल्याणमधील व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

मुंबई: कल्याण जवळील आंबिवली परिसरात नशेखोराकडून नागरिकांच्या घरांवर सुतळी बॉम्ब फेकल्याची घटना नुकतीच घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता नागरिकांसमोर नव्या संकटानं डोकं वर काढलं आहे. काही नशेखोरांनी सतीश यादव नावाच्या व्यक्तीच्या घरात जाऊन त्याला नाहक त्रास देत दिला. हा संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नशेखोरांच्या गैरवर्तणुकीमुळे नागरीक त्रस्त झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सतिशने पोलिसांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. दरम्यान, नशेखोरांच्या विरोधात पोलिसांनी ठोस कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. कल्याणमधील आंबिवलीनजीक पाटील नगर हा परिसर आहे. या परिसरात नशेखोर नागरिकांना त्रास देतात. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात काही नशेखोर नागरिकांच्या घरावर सुतळी बॉम्ब टाकत होते. त्यामुळे या परिसरात दहशत निर्माण झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली, याची माहिती समोर आली नाही.


व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आलं. सतिश नावाचा व्यक्ती पोलिसांकडे मदत मागत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतं. त्याचदरम्यान काही नशेखोर त्याला धरून ठेवतात. तो त्यांना त्या परिसरातून निघून जाण्यास सांगतो. हा व्हिडीओ व्हायरल होताच नागरिकांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली. आरोपींविरोधात ठोस कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी