मगरपट्ट्याच्या मागील बाजूस कॅनल फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी

पुणे : मगरपट्टा सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या कालव्याला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असून परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कॅनालमधून वेगाने वाहणारे पाणी रस्त्यावर येत असून मगरपट्टा सोसायटीमध्ये पाणी शिरले आहे. तसेच हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कंपन्यांमध्ये पाणी शिरले आहे .जवळच असलेल्या जहांगीर नगर येथील वस्तीमध्ये ही पाणी शिरत असून नागरिक भयभीत झाले आहेत.


मगरपट्टा रोड परिसरात सुरू असलेल्या पाइपलाइन कामामुळे कॅनालला मोठा धोका निर्माण होऊन अखेर कॅनाल फुटल्याची घटना घडली आहे. तसेच मागील अनेक दिवसांपासून कॅनालमधून किरकोळ पाणी गळती सुरू होती. अखेर मोठे भगदाड पडून कॅनाल फुटला. त्यामुळे परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.


मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने मगरपट्टाच्या मागील बाजूचे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. एका बाजूचा रस्सा बंद झाला असून एकच मार्ग सुरू असल्याने साधारण दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत.

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी