Colombia Plane Crash : कोलंबियामध्ये वायुसेनेच्या विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू, अनेक जण अद्याप बेपत्ता

दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया या देशात सोमवारी (२३ मार्च) एक भीषण विमान अपघात घडला. या अपघातात ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. अपघातग्रस्त विमानात एकूण १२५ जण प्रवास करत होते आणि टेक-ऑफनंतर काही क्षणांतच विमान कोसळले.


कोलंबियाच्या सैन्याने सुमारे ६६ जवानांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. यापूर्वी पुएर्तो लेगुइजामो शहराच्या महापौरांनी ३४ जवानांच्या मृत्यूची माहिती दिली होती. माध्यमांच्या अहवालानुसार २० हून अधिक जवान अजूनही बेपत्ता आहेत.


वायुसेनेने दिलेल्या माहितीनुसार, हरक्युलिस सी-१३० या विमानात १२१ जण होते, ज्यामध्ये ११० सैनिक आणि ११ क्रू सदस्यांचा समावेश होता. हे विमान सोमवारी उड्डाण करताना दुर्घटनाग्रस्त झाले. विमानाने कोलंबियातील पुटुमायो प्रांतातील पुएर्तो लेगुइजामो येथून उड्डाण केले होते; मात्र काही वेळातच ते कोसळले. हे अपघातग्रस्त विमान अमेरिकन कंपनी लॉकहीड मार्टिन यांनी तयार केलेले हरक्युलिस सी-१३० लष्करी वाहतूक विमान होते. अपघातानंतर विमानातून वाहतूक केली जात असलेला दारुगोळा आणि स्फोटकेही फुटल्याने बचावकार्य कठीण बनले.


हरक्युलिस सी-१३० ही विमाने १९५० च्या दशकात तयार करण्यात आली होती आणि कोलंबियाने १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात ही विमाने खरेदी केली होती. सध्या कोलंबियाचे सैनिक वाहून नेण्यासाठी या विमानांचा वापर केला जात आहे.पुएर्तो लेगुइजामो हे शहर पुटुमायो प्रांतात असून ते अमेझॉन क्षेत्रात येते. या प्रदेशाच्या सीमा इक्वाडोर आणि पेरू या देशांना लागून आहेत. संरक्षण मंत्री पेद्रो सांचेज यांनी ‘एक्स’वर दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त विमान पुटुमायोमधीलच दुसऱ्या शहरात सैनिकांना घेऊन जात होते.


कोलंबियातील माध्यमांनी शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये अपघातस्थळाजवळील शेतातून काळ्या धुराचे मोठे लोट उठताना दिसत आहेत. तसेच सैनिकांनी भरलेला एक ट्रक घटनास्थळाकडे वेगाने जाताना दिसत आहे. वायुसेनेच्या निवेदनानुसार, अपघातस्थळावरून किमान ७७ जणांना जखमी अवस्थेत वाचवण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, मृतांची अंतिम संख्या अद्याप निश्चित केली जात आहे.


कोलंबियन वायुसेनेचे कमांडर कार्लोस फर्नांडो सिल्वा यांनी सांगितले की, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि विमान विमानतळापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर कोसळले. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांच्या प्रशासनावर टीका करणाऱ्यांनी आरोप केला आहे की, बजेट कपातीमुळे लष्करी विमानांच्या उड्डाण तासांमध्ये घट झाली असून त्यामुळे वैमानिक आणि क्रू सदस्यांचा अनुभव कमी होत आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे