गडचिरोलीत आता इंजिनिअरिंगचे धडे मिळणार

गोंडवाना विद्यापीठाचा अभियांत्रिकी पदवीसाठी एसआयटीईकडे अर्ज; मंत्री चंद्रकांत पाटलांची विधान परिषदेत माहिती


मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक शिक्षणाची दारे अधिक रुंदावण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून गोंडवाना विद्यापीठात 'अभियांत्रिकी पदवी' (Degree in Engineering) अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली असून, त्यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडे (AICTE) अधिकृत अर्ज करण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात ही महत्त्वाची माहिती दिली.


आकांक्षित जिल्ह्यावर विशेष लक्ष


आमदार अमोल मिटकरी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, गडचिरोली हा केंद्र आणि राज्य सरकारच्या दृष्टीने 'आकांक्षित जिल्हा' असून, येथील तरुणांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्राथमिक ध्येय आहे. सध्या जिल्ह्यात अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्राचे पदविका (Diploma) अभ्यासक्रम सुरू असून आता पदवी स्तरावर तंत्रशिक्षण नेण्यासाठी सरकार सकारात्मक आहे.


कौशल्य विकासासाठी १७० कोटींची गुंतवणूक


गोंडवाना विद्यापीठ हे केवळ पदवी देणारे केंद्र न राहता कौशल्य विकासाचे मुख्य केंद्र बनत आहे. विद्यापीठात १७० कोटी रुपये खर्चून जागतिक दर्जाच्या 'स्किल डेव्हलपमेंट' पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये विशेषत: 'प्रोफेशनल फुलस्टॅक वेब डेव्हलपमेंट' अभ्यासक्रमातून १५२ विद्यार्थ्यांना थेट प्लेसमेंट आणि ३४१ विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळाली आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) सारख्या २१ व्या शतकातील तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जात आहे. गडचिरोलीतील संसाधनांचा विचार करून 'डिप्लोमा इन बांबू डिझाईन' आणि 'बांबू क्राफ्ट' सारखे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.


लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा


या चर्चेत आमदार विक्रम काळे, प्रवीण दरेकर आणि जगन्नाथ अभ्यंकर यांनीही उपप्रश्न उपस्थित करून गडचिरोलीतील शैक्षणिक सुविधांचा दर्जा वाढवण्याबाबत मागणी केली. त्यावर उत्तर देताना मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले की, दुर्गम भागातील विद्यापीठ असूनही गोंडवाना विद्यापीठाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, भविष्यात प्लेसमेंट आणि इंटर्नशिपच्या संधी आणखी व्यापक केल्या जातील.

Comments
Add Comment

Pratap Sarnaik : मंत्री प्रताप सरनाईकांनी आमदार नरेंद्र मेहतांशी संबंधित प्रकरणांचा अहवाल मागवला

- आपसी कुरघोड्यांना वेग; न्यायालयीन आदेश डावलून परवानग्या दिल्याच्या आरोपांचीही पडताळणी होणार मुंबई :

Ganpati Special Train : गणेश भक्तांसाठी खूशखबर! मुंबई ते मडगाव दरम्यान आणखी 4 विशेष गाड्या जाहीर, विशेष गाड्यांची एकूण संख्या 394 वर

मुंबई: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे.

The Paradise Movie : ‘हनुमान अंश’चा विक्रम मोडला? रिलीजआधीच नानीचा ‘द पॅराडाईज’ चर्चेत; ॲडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी कमाई

मुंबई : साऊथ सुपरस्टार नानीचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘द पॅराडाईज’ प्रदर्शनापूर्वीच ॲडव्हान्स बुकिंगमुळे

तिकीट विंडो उघडली अन् बंद झाली! एका मिनिटात भारत वेस्ट इंडिज सामन्याची सर्व तिकिटे विकली, झालं असं की..

वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आला असून तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या

FDA Raids : अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई; निकृष्ट अन्नपदार्थ, दुग्धजन्य पदार्थ आणि कोटींचा प्रतिबंधित साठा जप्त

मुंबई: महाराष्ट्रात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अन्न सुरक्षेचे नियम पायदळी तुडवणाऱ्या व्यावसायिक व

Chandrashekhar Bawankule : राज्यात चार अपर जिल्हाधिकाऱ्यांसह ४७ नवीन अप्पर तहसीलदार कार्यालयांची निर्मिती

मुंबई : ग्रामीण जनतेला शासकीय सुविधा सहज मिळाव्यात. महसुली सेवांचा लाभ जलद गतीने व्हावा. तसेच प्रशासकीय कामकाज