मुंबई: महाराष्ट्रात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अन्न सुरक्षेचे नियम पायदळी तुडवणाऱ्या व्यावसायिक व आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात अत्यंत आक्रमक आणि धडक मोहीम राबवली आहे. मुंबई, नागपूर, पुणे, कोकण, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह विविध विभागांमध्ये FDA ने केलेल्या अचानक छापासत्र व तपासणी मोहिमेत कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, निकृष्ट खाद्यतेल, दूध, मिठाई आणि बेकरीचा साठा जप्त करण्यात आला असून, अनेक जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
१. नागपूर व गडचिरोली विभाग: तेल, दूध आणि प्रतिबंधित साठ्यावर मोठी कारवाई
नागपूर आणि गडचिरोली भागात प्रशासनाने अत्यंत कठोर कारवाई करत मोठे घबाड बाहेर काढले आहे:
खाद्यतेलाचा काळाबाजार: नागपूर व गडचिरोलीत जुन्या व वापरलेल्या डब्यांचा (Reused Tin) पुनर्वापर करून खाद्यतेलाची पॅकिंग केली जात असल्याचे समोर आले. प्रशासनाने एकूण ६.७ टन सोयाबीन तेल जप्त केले असून, ११.८६ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त केला आहे.
दूध व दुग्धजन्य पदार्थ: १,७३,९६० रुपये किमतीचा ४५५ किलो आणि ७८ लिटर दूध व दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.
प्रतिबंधित साठा व अटक: नागपूर विभागात २१ आणि २२ सप्टेंबर २०२६ रोजी ८ आस्थापनांची तपासणी केली असता, ७ ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थ (गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू) आढळले. या कारवाईत १ कोटी ३१ लाख ८३ हजार २२२ रुपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा आणि वाहतुकीसाठी वापरलेली १९ लाख ६० हजार रुपयांची ३ वाहने जप्त करण्यात आली. याप्रकरणी ७ जणांना अटक करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबई : तंत्रज्ञान क्षेत्रातील ॲपलने नव्या Mac Mini आणि Mac Studio डेस्कटॉप संगणकांची भारतात विक्री सुरू केली आहे. 22 सप्टेंबरपासून हे मॉडेल्स खरेदीसाठी उपलब्ध ...
२. बृहन्मुंबई आणि ठाणे-भिवंडी विभाग: परवाने निलंबित व कोटींचे साहित्य जप्त
घाटकोपर (मुंबई): येथील प्रसिद्ध 'लक्ष्मी फरसाण' (Laxmi Farsan) दुकानात तपासणी केली असता, तिथे कीटकांची हालचाल (Pest Activity) आढळली. तसेच FIFO पद्धतीचे पालन न करणे, स्वच्छता व आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
भिवंडी व कोकण: मे. बी. जे. आर. सुपर फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, भिवंडी येथे लेबल नियमांचे उल्लंघन आणि निकृष्ट दर्जाचे केक मिक्स, बेकरी साहित्य, कॉर्न फ्लॉवर, कस्टर्ड पावडर असा ४,१६४ किलोहून अधिक आणि १ कोटी १५ लाखांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला.(FDA raids)
नवी मुंबई व रायगड: ज्योती फूड्समधून सुमारे १,९८८ किलो साठा जप्त करण्यात आला. तसेच रायगड आणि ठाणे परिसरातून (उदा. परिहार स्वीट्स, मनपसंत मिठाईवाला, श्री समर्थ डेअरी, आकाश डेअरी) सुट्टा खवा, पनीर आणि कच्चे दूध जप्त करून कारवाई करण्यात आली.
मुंबई प्रतिबंधित कारवाई: मुंबईत एका आस्थापनेच्या तपासणीत १२,४८,५०० रुपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करून २ जणांना अटक करण्यात आली.
३. पुणे विभाग: विनापरवाना हॉटेल्स आणि भेसळयुक्त मिठाईवर कारवाई
व्यवसाय बंद नोटीस: सांगली येथील मे. हॉटेल उत्कर्ष पॅलेस आणि सोलापूर येथील मे. गुलझार प्लेस यांच्याकडे FSSAI चा वैध परवाना नसताना उपहारगृह चालवले जात असल्याचे निदर्शनास आले. अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ च्या कलम ३१ नुसार या दोन्ही आस्थापनांना 'व्यवसाय बंद नोटीस' (Stop Business Notice) बजावण्यात आली.
दूध व मिठाई जप्त: पिंपरी येथील मे. लक्ष्मी स्विट्सकडून मलाई मोदक व कलाकंद, हडपसर येथील मे. अग्रवाल डेअरीकडून तूप, आणि बिबवेवाडीतील मे. ओम ट्रेडिंग कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर खवा व पनीर जप्त करण्यात आले. तसेच मुळशीतून कमी चरबीयुक्त पनीर जप्त केले गेले.(FDA raids)
टेक जायंट शाओमीने (Xiaomi) चीनमध्ये आपली नवीन जनरेशन फ्लॅगशिप सिरीज Xiaomi 18 Pro आणि Xiaomi 18 Pro Max अधिकृतपणे लाँच केली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स अत्याधुनिक ...
४. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभाग
ट्रकवर धाड: अहमदाबादवरून अकोल्याकडे जाणाऱ्या 'वेलकम ट्रॅव्हल्स'च्या बसमधून ५,००० किलो वजनाचा अत्यंत अस्वच्छ व निकृष्ट दर्जाचा मिठाईचा मोठा साठा जप्त करण्यात आला.
नाशिक विभाग: पिंपरी सय्यद येथील मे. व्ही. एच. एंटरप्रायजेसच्या गोदामावर कारवाई करत १२५.३७ लाख रुपये किमतीची तब्बल २०,३०० किलो भगर विना लेबल व अस्वच्छ वातावरणात साठवलेली आढळल्याने जप्त करण्यात आली. तसेच सिन्नरमधील राजकमल स्वीट्सचे मोदक आणि नाशिकमधील मातेश्वरी समोसा यांचे हजारो नग जप्त करण्यात आले. नंदुरबारमधून फ्रोजन डेझर्ट्स जप्त झाले.(FDA raids)
छत्रपती संभाजीनगर: कन्नड येथील मे. बालाजी बिकानेर स्वीट मार्टचा परवाना स्वच्छता नियमांचे उल्लंघन केल्यामुळे निलंबित करण्यात आला. वाळूजमधील मे. मोरया किराणा येथून निकृष्ट मसाला साठा जप्त करण्यात आला.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत शासन अत्यंत कठोर असून, जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई सुरूच राहील, असा इशारा FDA ने दिला आहे.(FDA raids)