Chandrashekhar Bawankule : राज्यात चार अपर जिल्हाधिकाऱ्यांसह ४७ नवीन अप्पर तहसीलदार कार्यालयांची निर्मिती

मुंबई : ग्रामीण जनतेला शासकीय सुविधा सहज मिळाव्यात. महसुली सेवांचा लाभ जलद गतीने व्हावा. तसेच प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व्हावे, यासाठी राज्यात ४७ नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. तसेच ४ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयेही स्थापन केली जाणार आहेत, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिली.


शासकीय कार्यालयांमधील कामकाजाचा वाढता व्याप, उपलब्ध अपुरा अधिकारी व कर्मचारीवृंद, तालुक्यांचे व जिल्ह्यांचे भौगोलिक अंतर, वाढती लोकसंख्या आणि वेगाने होणारे नागरीकरण विचारात घेऊन प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, नवीन कार्यालयांमुळे तहसील व जिल्हा प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध महसुली सेवा नागरिकांना त्यांच्या अगदी जवळ व सुलभपणे उपलब्ध होतील. (Chandrashekhar Bawankule)



प्रशासकीय विकेंद्रीकरणाला गती देण्यासाठी राज्यातील चार प्रमुख जिल्ह्यांमध्ये चार नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नागपूर जिल्ह्यातील नागपूर (ग्रामीण) येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. (Chandrashekhar Bawankule)


या निर्णयामुळे गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागासह राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य जनतेला विविध दाखले, जमिनीचे फेरफार, संजय गांधी निराधार योजना व इतर शासकीय सेवा घरपोच व वेळेत मिळण्यास या निर्णयामुळे मोठा हातभार लागणार आहे. (Chandrashekhar Bawankule)



या जिल्ह्यांचा समावेश


- गडचिरोली : कुरखेडा, आरमोरी, धानोरा, सिरोंचा, एटापल्ली व अहेरी तालुक्यातील अनुक्रमे मालेवाडा, वैरागड, पेंढरी, आसरअल्ली, कसनसूर व जिमलगट्टा.
- भंडारा : पवनी तालुक्यातील अड्याळ.
- वर्धा : हिंगणघाट व सेलू तालुक्यातील अनुक्रमे अल्लीपूर व सिंदी (रेल्वे).
- नागपूर : नागपूर (ग्रामीण), हिंगणा, नागपूर (शहर), कामठी, काटोल, नरखेड, मौदा व कुही तालुक्यातील अनुक्रमे बुटीबोरी, हुडकेश्वर, वानाडोंगरी, पारडी, वडोदा, कोंढाळी, जलालखेडा, कोदामेंढी व वेलतूर.
- वाशिम : कारंजा तालुक्यातील कामरगाव.
- बुलढाणा : सिंदखेड राजा व खामगाव तालुक्यातील अनुक्रमे साखरखेर्डा व लाखनवाडा.
- यवतमाळ : पुसद व उमरखेड तालुक्यातील अनुक्रमे शेंबाळ पिंप्री व ढाणकी.
- नांदेड : हदगाव, मुखेड व किनवट तालुक्यातील अनुक्रमे तामसा, मुक्रमाबाद व इस्लापूर.
- लातूर : लातूर तालुक्यातील मुरुड बुद्रुक.
- परभणी : जिंतूर तालुक्यातील चारठाणा.
- जालना : जालना तालुक्यातील नेर.
- बीड : बीड व आष्टी तालुक्यातील अनुक्रमे नेकनूर व कडा.
- छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा.
- अहिल्यानगर : अकोले व नेवासा तालुक्यातील अनुक्रमे राजूर व घोडेगाव.
- नंदूरबार : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी.
- नाशिक : बागलाण तालुक्यातील नामपूर.
- कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील मजरे कार्वे.
- सातारा : फलटण व कऱ्हाड तालुक्यातील अनुक्रमे साखरवाडी व उंब्रज.
- पुणे : खेड तालुक्यातील चाकण.
- पालघर : डहाणू, वसई व पालघर तालुक्यातील अनुक्रमे कासा, विरार व बोईसर.
- मुंबई उपनगर जिल्हा : कुर्ला, बोरीवली व अंधेरी तालुक्यातील अनुक्रमे चेंबूर, मालाड व वांद्रे.

Comments
Add Comment

Ganpati Special Train : गणेश भक्तांसाठी खूशखबर! मुंबई ते मडगाव दरम्यान आणखी 4 विशेष गाड्या जाहीर, विशेष गाड्यांची एकूण संख्या 394 वर

मुंबई: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आणि प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे.

The Paradise Movie : ‘हनुमान अंश’चा विक्रम मोडला? रिलीजआधीच नानीचा ‘द पॅराडाईज’ चर्चेत; ॲडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी कमाई

मुंबई : साऊथ सुपरस्टार नानीचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘द पॅराडाईज’ प्रदर्शनापूर्वीच ॲडव्हान्स बुकिंगमुळे

तिकीट विंडो उघडली अन् बंद झाली! एका मिनिटात भारत वेस्ट इंडिज सामन्याची सर्व तिकिटे विकली, झालं असं की..

वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आला असून तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या

FDA Raids : अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई; निकृष्ट अन्नपदार्थ, दुग्धजन्य पदार्थ आणि कोटींचा प्रतिबंधित साठा जप्त

मुंबई: महाराष्ट्रात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अन्न सुरक्षेचे नियम पायदळी तुडवणाऱ्या व्यावसायिक व

Qeshm explosion : दशकांची कटुता संपणार का ? अमेरिका-इराण ऐतिहासिक चर्चेत आले मोठे वळण, पण केशम बेटाजवळ का झाला स्फोट?

तेहरान: दीर्घकाळापासून एकमेकांचे कट्टर शत्रू मानले जाणाऱ्या अमेरिका आणि इराणच्या संबंधांवरून एक मोठी आणि

Devghar On Rent Movie : ‘देवघर ऑन रेंट’ चित्रपटातील ‘अगं आई गं...’ गाणं रिलीज; गौतमी पाटीलचा ठसकेबाज अंदाज!

मुंबई : अध्यात्म, रहस्य, थरार आणि ॲक्शनचा संगम असलेला ‘देवघर ऑन रेंट’ हा मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला