Dhurandhar 2 : अभिनेत्री अमिषा पटेलनं धुरंधर २ सिनेमाचं केलं कौतुक, बॉलिवूड इडंस्ट्रीला दिला 'हा' सल्ला

मुंबई - धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांपासून अनेक कलाकारांनी या सिनेमाचं भरभरून कौतुक केलं आहे. यामध्ये आता आणखीन एका अभिनेत्रीची भर पडली असून या अभिनेत्रीनं रणवीरच्या धुरंधर सिनेमाला डोळे उघडणारा सिनेमा म्हणत सिनेमाचं जोरदार कौतुक केलं आहे.


तिने सिनेमामध्ये इन्फ्लुएन्सर्सना कास्ट करण्याबाबतही आपलं मतं व्यक्त केलं आहे. धुरंधर २ सिनेमाचं कौतुक करत बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलनं आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.


या पोस्टमध्ये अमिषानं लिहिलं आहे की "डोळे उघडणारी गोष्ट. इंडस्ट्री धुरंधरची प्रशंसा करत आहे, सिनेमा प्रशंसेस पात्र आहे. इंडस्ट्रीनं हे लक्षात घ्यायला हवं की आदित्य धरने एक प्रोजेक्ट नाही, तर एक सिनेमा बनवला आहे. त्याने कलाकारांना कास्ट केलं आहे, पार्ट्यांमध्ये ट्रेंड होणाऱ्या इन्स्टाग्रामर्सना नाही. प्रोजेक्ट्स बनवणं थांबवा आणि सिनेमा बनवायला सुरुवात करा."





धुरंधर २ सिनेमा १९ मार्च २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातलाय. प्रदर्शित झाल्यापासून धुरंधर २ हा सिनेमा उत्तम कमाई करत असून अवघ्या सहा दिवसांत या सिनेमानं ९०० कोटींचा टप्पा पार केला आहे. जगभरात धुरंधर २ ची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या